माहिती आणि प्रसारण मंत्रालय

51व्या इफ्फीसाठी "बांगलादेश-कंट्री इन फोकस"

Posted On: 11 JAN 2021 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 जानेवारी 2021

 

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी यावर्षीच्या "कंट्री इन फोकस"साठीच्या देशाचे नाव आज जाहीर करण्यात आले. 51व्या इफ्फीसाठी "बांगलादेश-कंट्री इन फोकस" राहणार आहे.

कंट्री इन फोकस हा महोत्सवातला विशेष विभाग असून त्या देशाचे चित्रपट क्षेत्रातले योगदान आणि या क्षेत्रातल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीची दखल यामध्ये घेण्यात येते. 51व्या इफ्फीमध्ये या विभागात चार चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

1) तन्वीर मोकम्मल यांचा जीबोन्धुली

2) झहिदूर रहीम अंजान यांचा मेघमल्लार

3) रुबैयात होसेन यांचा अंडर कन्‍स्‍ट्रक्‍शन

4) सिन्सिअरली युअर्स, ढाका या नुहाश हुमायून, सईद अहमद शौकी, राहत रहमान जॉय, एमडी रोबीउल आलम, गोलम किब्रिया फारुकी, मीर मुकर्रम होसेन, तन्वीर एहसान, महमुदुल इस्लाम, अब्दुलाह अल नूर, कृष्णेदू चटोपाध्याय, सय्यद सालेह अहमद शोभन यांच्या चित्रपटाचा यात समावेश आहे.

 

 

इफ्फी विषयी माहिती :

952 मध्ये स्थापना झालेला,भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, (इफ्फी) आशियातल्या सर्वात महत्वाच्या चित्रपट महोत्सवापैकी एक आहे. दरवर्षी आयोजित होणारा हा महोत्सव सध्या गोव्यात होत आहे. जगभरातली सर्वोत्कृष्ट  चित्रपट कला सादर करण्यासाठी  चित्रपटाना सामायिक मंच पुरवण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक   वैशिष्ट्याच्या संदर्भातून विविध देशातली चित्रपट संस्कृती जाणून त्यासाठी योगदान देण्यासाठी आणि जगभरातल्या लोकांमध्ये मैत्री आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी महोत्सवाचे आयोजन केले जाते. माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत चित्रपट महोत्सव महासंचालनालय आणि गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सव आयोजित केला जातो.  51 वा इफ्फी 16 ते 24 जानेवारी 2021 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. 

 

* * *

M.Chopade/N.Chitale/D.Rane  

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1687743) Visitor Counter : 196