संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘‘1971 बांग्लादेश मुक्ती संग्राम’’ याविषयावर ऑनलाइन प्रश्नमंजूषेचे आयोजन
Posted On:
11 JAN 2021 8:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2021
2021 प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि बांग्लादेश मुक्ती संग्रामाला यंदा 50 वर्षे होत आहेत, यानिमित्त संरक्षण मंत्रालय आणि ‘मायगव्ह’ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन प्रश्नमंजूषेचे आयोजन केले आहे. दि. 11 ते 22 जानेवारी, 2021 या कालावधीमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या प्रश्नमंजूषेमुळे 1971 च्या युद्धात मिळविलेल्या विजयाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणे शक्य होणार असून लोकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होण्यास मदत मिळणार आहे.
या प्रश्नमंजूषेमधील विजेत्यांना रोख रकमेचे दहा पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम, व्दितीय, तृतीय आणि सात उत्तेजनार्थ पुरस्कारांचा समावेश आहे. याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
प्रथम पुरस्कार - रूपये 25,000/-
व्दितीय पुरस्कार - रूपये 15,000 /-
तृतीय पुरस्कार - रूपये 10,000 /-
उत्तेजनार्थ पुरस्कार - (सात)रूपये 5,000 /- प्रत्येकी
या प्रश्नमंजूषेमध्ये 14 वर्ष आणि त्यावरील सर्व भारतीय नागरिकांना सहभागी होता येणार आहे.
या प्रश्नमंजूषेमध्ये सहभागी होण्यासाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी.
https://quiz.mygov.in/quiz 1971-bangladesh-liberation-war-quiz/
* * *
Jaydevi PS/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1687717)
Visitor Counter : 218