उपराष्ट्रपती कार्यालय
ज्येष्ठ पत्रकार तुर्लापती कुटुंबा राव यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपतींकडून दुःख व्यक्त
Posted On:
11 JAN 2021 12:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2021
ज्येष्ठ पत्रकार तुर्लापती कुटुंबा राव यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांनी दुःख व्यक्त केले आहे.
ज्येष्ठ पत्रकार तुर्लापती कुटुंबा राव यांच्या निधनामुळे तीव्र दुःख झाल्याचे उपराष्ट्रपतींनी शोक संदेशात म्हटले आहे. स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, ख्यातनाम पत्रकार अशा महान आणि बहु आयामी व्यक्तिमत्वाच्या आणि स्वतः एक संस्थाच असलेल्या राव यांचा प्रदीर्घ सहवास मला लाभला.
पद्मश्री पुरस्कार प्राप्त राव यांनी आंध्र केसरी तंगुतुरी प्रकासम पंतुलू यांचे खाजगी सचिव असल्यापासूनच सर्वच क्षेत्रात उच्च नैतिक मूल्यांचे पालन केले.
विजयवाडा इथे नुकत्याच दिलेल्या भेटी दरम्यान मी रहात असलेल्या स्वर्ण भारत ट्रस्ट इथे त्यांनी माझी भेट घेतली. नेहमीप्रमाणेच उत्साही दिसणाऱ्या राव यांच्याशी विविध विषयांवर विस्तृत चर्चा झाली.
त्यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला. त्यांच्या मार्गावरून वाटचाल करत उच्च नैतिक मूल्यांचे पालन आपण करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल असे उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे.
राव यांच्या कुटुंबियांच्या आणि अनुयायांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. ओम शांती !
* * *
U.Ujgare/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1687586)
अभ्यागत कक्ष : 141