माहिती आणि प्रसारण मंत्रालय

51 वा इफ्फीने (IFFI) ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कार्यक्रमांची यादी केली जाहीर


मास्टरक्लास, संवाद सत्र, थेट प्रक्षेपण, ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शन, प्रश्नोत्तरांचे सत्र आणि चित्रपटांच्या रसग्रहणाचे सत्र

Posted On: 10 JAN 2021 8:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जानेवारी 2021

आशियातील सर्वांत जुना आणि भारतातील सर्वांत मोठ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (आयएफएफआय) 51 वी आवृत्ती 16 जानेवारी ते 24 जानेवारी 2021 या काळात गोवा येथे होणार आहे, या महोत्सवादरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

सध्या सुरू असलेली महामारीची परिस्थिती लक्षात घेता, भारतीय  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आपवा पहिला `हायब्रिड` (संकरित) चित्रपट महोत्सव आयोजित करत आहे. या वर्षी इफ्फी आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी काही कार्यक्रम ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आयोजित करणार आहे.

ठळक वैशिष्ट्ये-

  • सिंहावलोकनात्मक चित्रपट
  1. पेड्रो अल्मोदेवर

लाइव्ह फ्लेश / बॅड एज्युकेशन / व्हॉलव्हर

  1. रुबेन यॉस्टलन्ड

द स्क्वेअर / फोर्स मेज्युअर

  • मास्टरक्लासेस

शेखर कपूर, प्रियदर्शन, पेरी लँग, सुभाष घई, तन्वीर मॉकमेल

  • संवाद सत्र

रिकी केज, राहुल रावेल, मधुर भांडारकर, पाबलो सीसर, अबू बक्र शॉकी, प्रसून जोशी, जॉन मॅथ्यू मथ्थन, अंजली मेनन, आदित्य धर, प्रसन्न विथांगे, हरिहरन, विक्रम घोष, अनुपमा चोप्रा, सुनील दोशी, डॉमनिक संगमा, सुनीत टंडन

  • ओटीटी फ्लॅटफॉर्मवर काही जागतिक पॅनोरमा चित्रपट
  • द्‌घाटन आणि समारोप समारंभाचे थेट प्रसारण
  • प्रश्नोत्तरांचे सत्र
  • चित्रपट रसग्रहण सत्र

एफटीआयआय कडून प्रा. मझहर कामरान, प्रा, मधू अप्सरा, प्रा. पंकज सक्सेना

  • मिड फेस्ट फिल्म - वर्ल्ड प्रिमियर

मेहरुनिसा

आयएफएफआय चे संकेतस्थळ- https://iffigoa.org/

आयएफएफआयची समाज माध्यमे-

 इन्स्टाग्राम- https://instagram.com/iffigoa?igshid=1t51o4714uzle

ट्विटर- https://twitter.com/iffigoa?s=21

https://twitter.com/PIB_panaji

फेसबुक- https://www.facebook.com/IFFIGoa/

आयएफएफआय बद्दल थोडेसे-

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (आयएफएफआय), 1952 मध्ये स्थापना करण्यात आली, हा आशिया खंडातील सर्वात लक्षणीय चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी आयोजित होणारा महोत्सव सध्या  गोवा राज्यात आयोजित केला जात असून, जगभरातील चित्रपटसृष्टीतील चित्रपटाच्या कलेतील उत्कृष्टतेचे प्रदर्शन करण्यासाठी एक समान व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच विविध राष्ट्रांच्या चित्रपट संस्कृतीच्या त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा समजून घेणे आणि प्रशंसा  करणे, आणि जगभरातील लोकांशी मैत्री आणि सहकार्य करणे हा महोत्सवाचा उद्देश  आहे. चित्रपट महोत्सव संचालनालय (माहिती व प्रासरण मंत्रालयाच्या अंतर्गत) आणि गोवा राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केला जातो.

 

 

S.Kane/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1687534) Visitor Counter : 264