वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्यांनी सातव्या व्यापार धोरण आढावा दरम्यान 2015 पासून व्यापार आणि आर्थिक वातावरण सुधारण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे कौतुक केले

Posted On: 08 JAN 2021 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जानेवारी 2021

 
भारताच्या सातव्या व्यापार धोरण आढाव्याचे दुसरे  आणि अंतिम सत्र आज 8 जानेवारी 2021 रोजी जिनिव्हा येथील जागतिक व्यापार संघटनेत पार पडले . व्यापार धोरण आढावा  ही जागतिक व्यापार संघटनेच्या देखरेखीखालील एक महत्वाची यंत्रणा आहे ज्यात डब्ल्यूटीओकडून सदस्य देशांच्या व्यापार आणि संबंधित धोरणाची  डब्ल्यूटीओच्या नियमांचे सुधारित पालन करण्यासाठी योगदान देण्याच्या उद्देशाने तपासणी केली जाते,आणि  सदस्य देशाला रचनात्मक प्रतिसाद दिला जातो. 

टीपीआरसाठी भारताच्या अधिकृत प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व वाणिज्य सचिव डॉ. अनुप वाधवान यांनी केले. आपल्या शेवटच्या निवेदनात वाणिज्य सचिवांनी 6 जानेवारी 2021 रोजी झालेल्या भारताच्या व्यापार आढाव्याच्या पहिल्या सत्रादरम्यान सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना प्रभावीपणे प्रतिसाद दिला, तर डब्ल्यूटीओ सदस्यांनी भारताच्या भूमिकेविषयी आणि व्यापार, बहुपक्षीय व्यापार प्रणालीमधील योगदानाला  दिलेल्या महत्त्वाचे कौतुक केले.  या आढाव्यादरम्यान  विचारले गेलेले  1050 हून अधिक प्रश्न तसेच टीपीआरच्या बैठकीत सदस्य देशांनी  केलेल्या 53 हस्तक्षेपांवरून  याचा अंदाज बांधला जाऊ  शकतो.   

वाणिज्य सचिवांनी हे स्पष्ट केले की सुधारणा ही एक सतत आणि निरंतर सुरू असलेली प्रक्रिया आहे आणि भारताला  जगासाठी एक आकर्षक व्यापार आणि गुंतवणूक भागीदार बनवण्यासाठी केंद्र सरकार  वचनबद्ध आहे. तसेच उपलब्ध असलेल्या सर्व संधींचा उपयोग करून भारत जगाबरोबर अधिकाधिक आर्थिक आणि व्यापार संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता वरील अहवालात अव्वल 50 मध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवून एकूणच देशांतर्गत व्यवसायाचे वातावरण सुलभ  करण्यासाठी भारत वाचनबद्ध असल्याची माहिती वाणिज्य सचिवांनी सदस्यांना दिली. 

थायलंडच्या राजदूतांनी भारताच्या टीपीआर बाबत आपल्या समारोप भाषणात  या पारदर्शक आढाव्यासाठी  भारताच्या प्रयत्नांचे आणि वचनबद्धतेचे कौतुक केले. भारताच्या आढाव्यात  जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्यानी दाखवलेल्या रुचीची  दखलही त्यांनी घेतली आणि गेल्या पाच वर्षांत जगभरातील व्यापक आर्थिक मुद्द्यांबाबत  भारताने केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले. आढावा कालावधीत भारताकडून वस्तू व सेवा कर  स्वरूपात पथदर्शी संरचनात्मक सुधारणाचीही  प्रशंसा केली गेली.
        


* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1687164) Visitor Counter : 14