संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सीएसडीकडून अगेन्स्ट फर्म डिमांड (एएफडी) खरेदी करावयाच्या वस्तूंसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केले
Posted On:
08 JAN 2021 3:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2021
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सीएसडी कॅन्टीन कडून अगेन्स्ट फर्म डिमांड (एएफडी) खरेदी करावयाच्या वस्तूंसाठी https://afd.csdindia.gov.in/ हे ऑनलाईन पोर्टल सुरू केले. हे ऑनलाईन पोर्टल सुरु करण्याचा उद्देश सीएसडीच्या सुमारे 45 लाख लाभार्थींना सशस्त्र दलातील कार्यरत आणि सेवानिवृत्त नागरी संरक्षण कर्मचार्यांना एएफडी -I वस्तू खरेदी करण्यासाठी (कार, मोटरसायकल, वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रिज इत्यादी) सक्षम करणे हा आहे.
या पोर्टलच्या शुभारंभाची प्रशंसा करताना संरक्षण मंत्र्यांनी सशस्त्र दलाचे सर्व जवान, अधिकारी आणि निवृत्त जवानांच्या कल्याणाप्रति सरकारची वचनबद्धता व्यक्त केली. या प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेसाठी त्यांनी संपूर्ण चमूचे कौतुक केले. राजनाथ सिंह म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना असलेल्या डिजिटल इंडियाच्या अनुषंगाने हा प्रकल्प होता.
हा समारंभ नवी दिल्ली येथे पार पडला. आता अधिकृतपणे सुरू करण्यात आलेले व जलद आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देणार्या afd.csdindia.gov.in या पोर्टलच्या चाचणी दरम्यान ज्यांनी या वस्तू खरेदी करण्यासाठी नोंदणी केली त्यांना कार / मोटारसायकली वितरित केल्याचे थेट प्रक्षेपण दिल्ली, अहमदाबाद व जयपूर येथून केले गेले.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, नौदल प्रमुख अॅडमिरल करंबीर सिंह, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया आणि संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
* * *
U.Ujgare/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1687082)
Visitor Counter : 253