वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

शेजारच्या सार्क देशामध्ये कृषी व प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांच्या निर्यातीच्या विस्तारासाठी एपीईडीए आणि भारतीय दूतावासाने भूतानबरोबर आभासी खरेदीदार -विक्रेता बैठकीचे केले आयोजन

Posted On: 08 JAN 2021 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जानेवारी 2021
 

भारताच्या कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादनांच्या निर्यात संभाव्यतेला चालना देण्यासाठी एपीईडीएने  07 जानेवारी 2021 रोजी भूतानमधील भारतीय दूतावासाच्या सहकार्याने आभासी खरेदीदार -विक्रेता बैठकीचे आयोजन  केले. कृषी अन्नधान्य क्षेत्रात भारत आणि भूतानमधील धोरणात्मक  सहकार्य दृढ करण्यासाठी या बैठकीने संबंधित सरकार आणि व्यापारातील प्रमुख हितधारकांना सामायिक मंचावर एकत्र आणले.

एपीईडीएने विविध देशांसमवेत आयोजित केलेल्या अशा कार्यक्रमांच्या मालिकेत भूतानबरोबर ही 15 वी व्हर्च्युअल खरेदीदार -विक्रेता बैठक होती. यापूर्वी अशी पहिली आभासी बैठक संयुक्त अरब अमिराती (युएई) बरोबर आयोजित केली होती त्यानंतर कुवैत, इंडोनेशिया, स्वित्झर्लंड, बेल्जियम, इराण, दक्षिण आफ्रिका, जर्मनी, यूएसए, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, थायलंड आणि ओमान यांच्याबरोबर बैठका झाल्या.

व्हर्च्युअल-बीएसएम दरम्यान, भूतानला संभाव्य कृषी उत्पादनांची निर्यात करण्याबाबत  फूड कॉर्पोरेशन ऑफ भूतान लिमिटेड (एफसीबीएल), कृषी व वन मंत्रालय, भूतान आणि भारतातील व्यापार संघटना (भाजीपाला व फळ निर्यातदार संघटना (व्हीएफए), ऑल इंडिया फूड प्रोसेसर असोसिएशन (एआयएफपीए), आखिल भारतीय मांस व पशुधन निर्यातक संघटना (एआयएमईएलए), तांदूळ निर्यातदार संघटना  (टीआरईए) यांनी सादरीकरण केले.

व्हर्च्युअल बीएसएम मध्ये भूतानमधील भारताच्या राजदूत रुचिराकंबोज, एपीईडीएचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथु, कृषी व वने मंत्रालयाच्या कृषी व विपणन सहकारी विभागाचे महासंचालक उग्यानपेंजोर, आणि एपीएडीए आणि भारत व भूतान दूतावासातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सध्या सुरू असलेल्या कोविड-19 महामारीमुळे, निर्यात प्रोत्साहन  कार्यक्रम प्रत्यक्ष आयोजित करणे शक्य नव्हते. भारत आणि भूतानच्या निर्यातदारांना आणि आयातदारांना व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी एपीईडीएने आभासी बैठक आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला.

कोविड महामारीपासून कृषी व प्रक्रियायुक्त अन्न क्षेत्रात आघाडी करण्यासाठी नवीन  संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने मध्य पूर्व, सार्क, दक्षिण पूर्व आशिया आणि पाश्चात्य व्यापार भागीदारांकडे लक्ष केंद्रित झाले आहे.


  
* * *

U.Ujgare/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1687079) Visitor Counter : 179