माहिती आणि प्रसारण मंत्रालय
51 व्या इफ्फीमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी दर्जेदार चित्रपटांची मांदियाळी
Posted On:
07 JAN 2021 6:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जानेवारी 2021
51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने या महोत्सवादरम्यान स्पर्धेसाठी दर्जेदार चित्रपटांची घोषणा केली आहे. या विभागातील स्पर्धेसाठी जगभरातील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मची (कथापट) निवड केली जाते. हा महोत्सवातील सर्वात महत्वाचा विभाग आहे ज्यात वर्षभरातील काही सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा समावेश आहे आणि या 15 चित्रपटांमध्ये गोल्डन पीकॉक आणि इतर पुरस्कारांसाठी चुरस असेल.
या दर्जेदार चित्रपटांमध्ये खालील चित्रपटांचा समावेश आहे-
- The Domain by Tiago Guedes (Portugal)
- Into The Darkness by Anders Refn (Denmark)
- February by KamenKalev (Bulgaria, France)
- My Best Part by Nicolas Maury (France)
- I Never Cry by Piotr Domalewski (Poland, Ireland)
- La Veronica by Leonardo Medel (Chile)
- Light For The Youth by Shin Su-won (South Korea)
- Red Moon Tide by Lois Patiño (Spain)
- Dream About Sohrab by Ali Ghavitan (Iran)
- The Dogs Didn’t Sleep Last Night by RaminRasouli (Afghanistan, Iran)
- The Silent Forest by KO Chen-Nien (Taiwan)
- The Forgotten by Daria Onyshchenko (Ukraine, Switzerland)
- Bridge by KripalKalita (India)
- A Dog And His Man by SiddharthTripathy (India)
- Thaen by Ganesh Vinayakan (India)
हे चित्रपट विविध प्रकारच्या पुरस्कारांसाठी स्पर्धा करतील, उदा.
- सर्वोत्कृष्ट चित्रपट (गोल्डन पीकॉक) - हा पुरस्कार रोख 40,00,000 / रुपयांचा असून तो दिग्दर्शक आणि निर्माता यांच्यात समान विभागून दिला जातो. रोख रकमेव्यतिरिक्त दिग्दर्शकाला गोल्डन पीकॉक आणि प्रमाणपत्रही मिळेल. निर्मात्याला रोख रकमेव्यतिरिक्त प्रमाणपत्रही प्राप्त होईल.
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: सिल्वर पीकॉक, प्रमाणपत्र आणि 15,00,000/- रुपयांचे रोख बक्षीस
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष): सिल्वर पीकॉक, प्रमाणपत्र आणि 10,00,000/-रुपयांचे रोख बक्षीस
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला): सिल्वर पीकॉक, प्रमाणपत्र आणि 10,00,000/-रुपयांचे रोख बक्षीस
- विशेष ज्युरी पुरस्कारः एखाद्या चित्रपटाला सिल्वर पीकॉक, प्रमाणपत्र आणि 15,00,000/- चे रोख बक्षीस (परीक्षक पसंती) किंवा एखादी व्यक्ती (चित्रपटातील त्याच्या/तिच्या कलात्मक योगदानाबद्दल) जर एखाद्या चित्रपटाला हा पुरस्कार दिला गेला तर तो चित्रपटाच्या दिग्दर्शकाला दिला जातो.
S.Kane/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1686840)
Visitor Counter : 257