वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
उत्तम दर्जा आणि उत्पादकता या दोन अत्यंत महत्त्वाच्या पायांवर भविष्यातील भारतीय उद्योग उभा राहणार आहे असे पीयुष गोयल यांचे प्रतिपादन
‘ब्रँड इंडिया’च्या उभारणीसाठी आपण आपल्या प्रवासात प्रगती करून उत्पादन तसेच सेवा यांचे वितरण अत्यंत कार्यक्षमपणे आणि परिणामकारकरित्या करायला हवे : पीयुष गोयल
Posted On:
06 JAN 2021 8:30PM by PIB Mumbai
उत्तम दर्जा आणि उत्पादकता या दोन अत्यंत महत्त्वाच्या पायांवर भविष्यातील भारतीय उद्योग समर्थपणे उभा राहील असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि व्यापार, रेल्वे, ग्राहक व्यवहार आणि अन्न तसेच सार्वजनिक वितरण मंत्री पीयुष गोयल यांनी म्हटले आहे. उद्योग मंथन या वेबिनारचे उद्घाटन करताना ते आज बोलत होते. ‘ब्रँड इंडिया’च्या उभारणीसाठी आपण आपल्या प्रवासात प्रगती करून उत्पादन तसेच सेवा यांचे वितरण अत्यंत कार्यक्षमपणे आणि परिणामकारकरित्या करायला हवे असे ते म्हणाले. याद्वारे आपण आपल्या दर्जाची सक्षमता आणि आपल्या उत्पादनाचे मूल्य यांच्या जोरावर जागतिक दर्जाची सेवा देऊ शकतो असे ते पुढे म्हणाले.
केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि व्यापार मंत्रालयाच्या उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने भारतीय दर्जा मंडळ, राष्ट्रीय उत्पादकता मंडळ आणि औद्योगिक संस्थाच्या संयुक्त सहकार्याने, भारतीय उद्योग क्षेत्रातील दर्जा आणि उत्पादकता यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उद्योग मंथन या लक्ष्याधारित क्षेत्र-विशिष्ट वेबीनारचे आयोजन केले आहे. हा वेबीनार 4 जानेवारी 2021 ला सुरु झाला असून तो 2 मार्च 2021 पर्यंत चालणार आहे. या वेबीनार मालिकेत, 45 सत्रे होणार असून त्यात उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील प्रमुख मुद्द्यांची चर्चा होणार आहे. उद्योग मंथनमध्ये उद्योग क्षेत्रासमोरील आव्हाने आणि संधी ओळखणे, त्यावरच्या उपाययोजना आणि सर्वोत्तम प्रक्रिया निश्चित करणे या उद्देशाने विचारमंथन होईल. “आत्मनिर्भर भारता”चे ध्येय साध्य करण्यासाठी आणि ‘व्होकल फॉर लोकल’ ला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उद्योग आणि क्षेत्रांतील दर्जा आणि उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने या उपक्रमातून खूप गोष्टी शिकता येतील.
जागतिक पातळीवरील लवचिक पुरवठा साखळीचा भाग होण्याची आशा असणाऱ्या आणि जगभरातील बाजारपेठांमध्ये सेवा देण्याची इच्छा बाळगणाऱ्या भारताने दर्जाच्या प्रमाणकांमध्ये सुधारणा करण्याची हीच वेळ आहे असे ते म्हणाले. कार्यरत एकल-ब्रँड किरकोळ विक्री,कोळसा, खनिकर्म आणि उत्पादन यांसह अनेक क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सध्या देशात अत्यंत मुक्त, थेट परदेशी गुंतवणुकीची चौकट उपलब्ध आहे, आपण अत्यंत वेगाने अनेक क्षेत्रे खुली करून भारतातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देत आहोत असे गोयल यांनी सांगितले.
****
M.Chopade/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1686642)
Visitor Counter : 178