आदिवासी विकास मंत्रालय

ईशान्य भारतात निर्मित उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीतील ट्रायफेड संस्था ईशान्य प्रदेश विकास विभाग आणि भारतीय टपाल विभागाच्या सहकार्याने सुरु करीत आहे  नवे विपणन आणि मालवाहतूक उपक्रम

Posted On: 03 JAN 2021 3:09PM by PIB Mumbai

 

आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीतील ट्रायफेड अर्थात भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास मंडळ, ईशान्य प्रदेश विकास विभाग आणि भारतीय टपाल विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने ईशान्येकडील राज्यांमध्ये तयार केल्या जाणाऱ्या उत्तम आणि पारंपरिक आदिवासी उत्पादनांचे यशस्वी विपणन आणि मालवाहतूक करण्यासाठी नवा उपक्रम सुरु करणार आहे.  आदिवासी उत्पादनांच्या अधिकाधिक पुरवठादारांना सहभागाची संधी आणि सोयी सुविधा मिळाल्यामुळे या भागातील उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यामुळे तेथील आदिवासी समुदायांमध्ये रोजगाराच्या अधिक संधी तसेच उत्पन्न वाढीला चालना मिळेल.

A picture containing person, indoor, people, groupDescription automatically generated

नियोजित उपक्रमांमध्ये पुरवठादार आणि त्यांच्या समूहांचा शोध घेणे, उत्पादनांचे स्त्रोत निश्चित करणे, आदिवासी साधनसंपत्तीचा विकास आणि प्रशिक्षण, आदिवासी उत्पादनांचे एकत्रीकरण आणि विक्री, निवडक उत्पादनांची वाहतूक आणि त्यांचे ट्राईब्ज इंडिया दुकानांना वितरण आणि तिथून ग्राहकांपर्यंत पोहोचणे यांचा समावेश आहे. ईशान्य प्रदेश विकास विभाग त्याच्या विविध संलग्न संस्थांच्या माध्यमातून यासाठी काम करेल तर या उत्पादनांचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये विपणन आणि ब्रांडिंग करण्यासाठी  ट्रायफेड त्याच्या दुकानांच्या साखळ्या आणि ई- व्यापार मंचाचा वापर करेल.

A picture containing tree, outdoor, grass, personDescription automatically generated

जीआय टॅग अर्थात या उत्पादनांना विशिष्ट भौगोलिक ओळख क्रमांक देऊन या उत्पादनांच्या मूळ उत्पत्तीस्थानाविषयी पारदर्शकता आणता येऊ शकेल. या उपक्रमामुळे, ईशान्येकडील राज्यांतील नागरिकांमध्ये त्यांचा प्रदेश, त्यांची समृध्द परंपरा आणि उत्पादनांचा उच्च दर्जा यांच्याबद्दल जाणीव निर्माण होईल. या उपक्रमासाठी लागणाऱ्या सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी भारतीय टपाल विभागाचे सहकार्य घेण्याचा निर्णय झाला आहे.

याखेरीज, जानेवारी महिन्यात पोस्ट विभागाकडून भरविण्यात येणाऱ्या टपाल प्रदर्शनात यात भौगोलिक ओळख क्रमांक  असलेल्या सहा उत्पादनांचे प्रदर्शन करून त्यांची जाहिरात केली जाईल. फेब्रुवारीत होणाऱ्या ट्रायफेडच्या भौगोलिक ओळख क्रमांक विशिष्ट आदि महोत्सव प्रदर्शनात हीच उत्पादने प्रोत्साहित केली जातील. वन धन विकास केंद्रांतील लाख आणि राळ यांचा पुरवठा टपाल विभागाच्या मदतीने करण्याची योजना आखण्यात आली आहे. भविष्यात भेट देण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू म्हणून भारतीय टपाल विभाग आदिवासी कलाकारांनी तयार केलेल्या उत्पादनांची आणि कलाकुसरीच्या वस्तूंची खरेदी करणार आहे.

****

M.Chopade/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1685790) Visitor Counter : 240