शिक्षण मंत्रालय

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी केल्या केंद्रिय परिक्षा मंडळाच्या 2021 मधील परिक्षांच्या तारखा जाहीर

Posted On: 31 DEC 2020 8:17PM by PIB Mumbai

 

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंकयांनी आज केंद्रीय परिक्षा मंडळाच्या परिक्षांचा तारखा जाहीर केल्या.

10 वी व 12 वी च्या केंद्राच्या परिक्षा 4 मे 2021 ते 10 जून, 2021 या कालावधीत घेतल्या जातील व त्यांचे निकाल 15 जुलैच्या दरम्यान जाहीर होतील, असे पोखरियाल यांना सांगितले. बारावीच्या प्रयोगपरिक्षा 1 मार्च 2021 ला सुरू होतील अशीही माहिती त्यांनी दिली.

Announcing the date of commencement for #CBSE board exams 2021. @SanjayDhotreMP @EduMinOfIndia @cbse @mygovindia @MIB_India @PIB_India @DDNewslive https://t.co/PHiz3EwFvz

— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) December 31, 2020

 

कोविड-19 महामारीमुळे विद्यार्थी, शिक्षक व शाळांना अकल्पित व अनिश्चित परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.  तरीही, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शिक्षक अविश्रांत परिश्रम घेत आहेत. शिक्षकांचे परिश्रम व त्यांनी तंत्रज्ञानाशी जुळवून घेत, शिकवण्याच्या नवनवीन पद्धतींचा अवलंब केल्याबद्दल त्यांनी शिक्षकवर्गाची प्रशंसा केली.  डिजिटल माध्यमातून शिक्षणासाठी सरकारने विविध मंच आणि सामग्री उपलब्ध करून दिली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी केलेल्या सूचनांचा विचार करून परिक्षांच्या तारखांसंबधी निर्णय घेतल्याचे पोखरियाल यांनी स्पष्ट केले.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा देत पोखरियाल यांनी मंडळाच्या परिक्षेत तसेच पुढील आयुष्यात विद्यार्थ्यांना उत्तम यशाच्या शुभेच्छा दिल्या.

***

G.Chippalkatti/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1685188) Visitor Counter : 171