आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

2020 या वर्षात कोविड-19च्या आव्हानांची पूर्तता करण्यासाठी स्वदेशी वैद्यकीय उपकरण उद्योगाचे झाले रुपांतरण, विकास आणि विस्तार

Posted On: 31 DEC 2020 3:54PM by PIB Mumbai

 

2020 हे  वर्ष  देशात वैद्यकीय पुरवठा क्षेत्रात झालेल्या प्रचंड मोठी कामगिरीचे  साक्षीदार आहे. कोरोना महामारीच्या आरंभीच्या काळात भारत जवळजवळ पूर्णपणे आयात केलेले व्हेंटिलेटर,पीपीई किट्स आणि एन-95 मास्क यावर अवलंबून होता. तसे पहावयास गेल्यास या महामारीविरुध्द लढा देण्यासाठी आवश्यक असलेल्या वाटते वैद्यकीय उत्पादनांसाठी कोणतीही विशिष्ट मानके तोवर नव्हती. केंद्रसरकारने या महामारीने उभ्या केलेल्या आव्हानांना सुरवातीच्याच काळात ओळखले आणि देशभरात आवश्यक त्या वैद्यकीय वस्तूंची गरजेपेक्षा जास्त उपलब्धता आणि अत्यावश्यक वैद्यकीय वस्तूंचा पुरवठा होत राहील,हे सुनिश्चित केले.

2020 च्या फेब्रुवारी-मार्च  महिन्यात भारतात व्हेंटिलेटरची सरासरी किंमत 15 लाख रुपये इतकी होती,आणि जवळपास सर्वच आयात केले जात असत.भारतीय उद्योगांनी व्हेंटिलेटर्सचे उत्पादन सुरू केल्याने, त्याची सरासरी किंमत सध्या 2 ते 10 लाख इतकी खाली आली आहे. गेल्या 9 महिन्यात मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत 36,433 व्हेंटिलेटर्स सरकारी रुग्णालयांत पोहोचले असल्याचे सुनिश्चित केले. हे विशेष महत्त्वाचे आहे,कारण स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते कोविड पूर्व काळापर्यंत देशातील सर्व सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये मिळून 16,000 व्हेंटिलेटर्स होते, परंतु गेल्या 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 36,433 मेक इन इंडिया(भारतात तयार केलेले) व्हेंटिलेटर्स सर्व सार्वजनिक आरोग्य सुविधा असलेल्या ठिकाणांवर  पुरविले गेले आहेत. व्हेंटिलेटर्सवरील सर्व  निर्यात निर्बंध आता हटविण्यात आले असून,मेक इन इंडिया व्हेंटिलेटर्स आता निर्यात होत आहेत.

पीपीई किट्सच्या बाबतीत मार्च महिन्यातील  मर्यादित  उत्पादन क्षमतेच्या तुलनेत  भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश बनला आहे.भारताची  पीपीई किटस्ची उत्पादन क्षमता दररोज 10 लाखपेक्षा जास्त झाली असून ते अनेक देशांमध्ये निर्यात होत आहेत. सरकारी ई मार्केट प्लेस(GeM) या पोर्टलवर जवळपास1700 स्वदेशी  उत्पादक आणि पुरवठादारांची नोंदणी झाली असून त्यापैकी अनेक डझन उत्पादकांना बीआयएसने(BIS)प्रमाणित केले आहे. सुमारे 170 लाख पीपीई किट्स राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आणि केंद्रीय संस्थांना विनामूल्य वाटण्यात आले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडे उपलब्ध असलेला पीपीई किट्सचा बफर स्टाॅक मार्च महिन्यातील 2 लाख वरून 89 लाख इतका वाढला आहे.गेल्या 9 महिन्यांत त्याची सरासरी किंमत  600 रुपये प्रती किट वरुन 200 रुपये प्रती किट इतकी कमी झाली आहे.

त्याचप्रमाणे, मार्च 2020 मधे  दररोज 1लाख इतके मध्यम प्रतीचे  एन-95 मास्कचे उत्पादन करणारे केवळ 3 पुरवठादार होते. सध्या 3000 पेक्षा जास्त उत्पादक आणि पुरवठादार यांची GeM पोर्टलवर नोंदणी झाली असून त्यापैकी 1509  BIS प्रमाणित आहेत आणि देशात दरदिवशी 8 लाखांपेक्षा जास्त स्वदेशी मास्क  उत्पादन होत आहे. हे देखील मोठ्या प्रमाणावर भारतातून निर्यात केले जात आहेत. आतापर्यंत 4 कोटीपेक्षा जास्त एन-95  मास्क विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि सरकारी संस्थांमधे विनामूल्य वितरीत झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडे उपलब्ध असलेला एन-95 मास्कचा बफर स्टाॅक मार्चमधील 9 लाखांवरून झपाट्याने वाढत 146 लाखांवर आला आहे आणि याच काळात  त्याची सरासरी किंमत 40 रुपयांवरून 12 रुपयांवर आली आहे.

सरकारने यापूर्वीच 83 कोटी सिरींजेसच्या खरेदीचे आदेश दिले आहेत.याशिवाय जवळपास 35 कोटी  सिरींजेससाठी अधिक निविदा मागविण्यात आल्या आहेत. याचा उपयोग कोविड लसीकरण आणि युनिव्हर्सल लसीकरण कार्यक्रमासाठी केला जाईल.

***

G.Chippalkatti/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1685075) Visitor Counter : 295