परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

एस्टोनिया, पराग्वे आणि डॉमनिक प्रजासत्ताकमध्ये तीन भारतीय मिशन उघडण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

प्रविष्टि तिथि: 30 DEC 2020 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये एस्टोनिया, पराग्वे आणि डॉमनिक प्रजासत्ताकमध्ये तीन भारतीय मिशन उघडण्यास मान्यता देण्यात आली.

 

अंमलबजावणीची रणनीती:

या देशांमध्ये भारतीय मिशन सुरू झाल्यामुळे तिनही देशांबरोबर राजनैतिक संबंध विस्तारण्यास मदत मिळणार असून ते अधिक सखोल होतील. यामुळे व्दिपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहार यांच्यामध्ये वाढ होऊ शकणार आहे. त्याचबरोबर या देशांमधल्या आणि आपल्या देशातल्या लोकांना एकमेकांशी सुलभतेने संपर्क साधणे शक्य होणार आहे. बहुपक्षीय क्षेत्रामध्ये राजकीय प्रसार वाढवून भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या देशांची मदत मिळू शकणार आहे.

या देशांमध्ये उघडण्यात आलेल्या भारतीय मिशनमुळे  तिथे वास्तव्य करणा-या भारतीयांना चांगल्या प्रकारे मदत मिळू शकणार असून त्यांच्या हिताचे रक्षण करू शकणार आहे.

 

उद्देश:

भारताच्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट म्हणजे मित्र देशांच्या मदतीने भारताच्या विकासासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचे आहे. त्याचबरोबर सध्या जगभरामध्ये मिशन्स सुरू करण्यात आली आहेत, त्या माध्यमातून भागीदार देशांबरोबर संबंध बळकट करण्याचे काम केले जात आहे.

नव्याने तीन मिशन उघडण्याचा निर्णय घेऊन भारताने राष्ट्र विकासाला प्राधान्य देतानाच ‘सबका साथ, सबका विकास’ या दृष्टिकोनातून पुढाकार घेण्यासाठी टाकलेले पाऊल आहे. भारताच्या राजनैतिक उपस्थितीचा विस्तार करणे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कंपन्यांचा प्रवेश सुकर करणे, भारतीय वस्तू आणि सेवांच्या निर्यातीला चालना देणे, हा उद्देश या मिशन्स सुरू करण्यामागे आहे. यामुळे भारताला स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर बनविण्याचे ध्येय साध्य करण्यास मदत मिळणार आहे. याचा देशांतर्गत उत्पादन आणि रोजगार निर्मिती वृद्धीवर थेट परिणाम दिसून येणार आहे.

 

* * *

S.Tupe/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1684688) आगंतुक पटल : 226
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Telugu , Malayalam