राष्ट्रपती कार्यालय

तांत्रिक विकासास बर्‍याचदा 'व्यत्यय' म्हणून संबोधले जाते, परंतु यावर्षी त्यांनी आम्हाला मोठे व्यत्यय दूर करण्यास चांगली मदत केली: राष्ट्रपती कोविंद


राष्ट्रपतींनी आभासी पद्धतीने डिजिटल इंडिया पुरस्कार 2020 प्रदान केले

प्रविष्टि तिथि: 30 DEC 2020 2:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 डिसेंबर 2020

 

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगातील सामाजिक संबंध, आर्थिक घडामोडी, आरोग्य सेवा, शिक्षण आणि जीवनातील इतर पैलूंमध्ये बदल झाले. अद्याप, जीवन ठप्प झाले नाही – यासाठी माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाचे मोठ्या प्रमाणात आभार मानायला हवे. तांत्रिक विकासास बर्‍याचदा 'व्यत्यय' म्हणून संबोधले जाते, परंतु यावर्षी त्यांनी आम्हाला मोठे व्यत्यय दूर करण्यास चांगल्या प्रकारे मदत केली असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले. ते आज (30 डिसेंबर 2020) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डिजिटल इंडिया पुरस्कार 2020 प्रदान सोहळ्यात बोलत होते.   

भारताने केवळ गतिशीलता-निर्बंधाचा प्रतिकूल परिणाम कमी केले नाहीत तर विविध क्षेत्रात आगेकूच करण्यासाठी या संकटाचा उपयोग संधी म्हणून देखील केला. अलिकडच्या काही वर्षांत डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत केल्यामुळेच हे शक्य झाले. ते म्हणाले की बहुतांश संस्थांनी ऑनलाईन वर्ग सुरु केल्याने विनाअडथळा शिक्षण सुरूच राहिले. न्यायव्यवस्थेपासून टेलिमेडिसीनपर्यंत अनेक क्षेत्रं आभासी पद्धतीने आपले कामकाज करत आहेत. नागरिकांना विविध सेवा देण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेची चाके निरंतर फिरत ठेवण्यासंदर्भात सरकारसाठी देखील माहिती तंत्रज्ञान हे सर्वात महत्त्वपूर्ण साधन होते.

 

राष्ट्रपतींच्या संपूर्ण भाषणासाठी कृपया येथे क्लिक करा


* * *

U.Ujgare/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1684600) आगंतुक पटल : 263
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Tamil , Telugu