शिक्षण मंत्रालय

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे केली तिहान (Ti HAN ) आयआयटी हैदराबाद याची  पायाभरणी-भारताच्या पहिल्या स्वयंचलित दिशादर्शक  यंत्रणेच्या (जमिनीवरील आणि आकाशातील ) चाचणीचा पहिला टप्पा

Posted On: 29 DEC 2020 7:41PM by PIB Mumbai

 

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल 'नि:शंक' यांनी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री  संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत तिहान  आयआयटी हैदराबाद येथील भारताच्या पहिल्या स्वयंचलित दिशादर्शक यंत्रणेच्या (जमिनीवरील आणि आकाशातील )चाचणीच्या पहिला टप्प्याची पायाभरणी दृकश्राव्य माध्यमाद्वारे केली.

Laying the foundation stone of TiHAN Autonomous Navigation Testbed at @IITHyderabad. @SanjayDhotreMP @EduMinOfIndia @PIB_India @MIB_India @DDNewslive @mygovindia https://t.co/0jtWVcBAp2

— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) December 29, 2020

 

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने, आयआयटी हैदराबादला, नॅशनल मिशन ऑफ इंटरडिसिप्लिनरी सायबर-फिजिकल सिस्टीम (NM-ICPS)च्या अंतर्गत स्वयंचलित दिशादर्शन आणि डाटा अँक्व्हिझीशन यंत्रणेचे तंत्रज्ञान नवनिर्मिती केंद्र निर्माण करण्यासाठी 135 कोटी रुपये मंजूर केले होते. तिहान   फाऊंडेशन म्हणून ओळखले जाणारे आयआयटी हैदराबाद येथील, मानव विरहीत हवाई वाहन आणि रीमोटद्वारे चालणाऱ्या वाहन यासाठीचे स्वयंचलित दिशादर्शक यंत्रणेवर चालणारे तंत्रज्ञान नवनिर्मिती केंद्र संस्थेद्वारे सेक्शन-8 कंपनी म्हणून गठीत केले होते.

तंत्रज्ञानाच्या या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करत पोखरीयाल म्हणाले ,"तिहान फाऊंडेशन हा आयआयटी हैदराबाद येथील बहुआयामी  उपक्रम असून त्यात इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल अँड एरोस्पेस, सिव्हिल, मॅथेमॅटीक्स आणि डिझाईन अशा सर्व शाखांतील संशोधकांचा हातभार लागला असून त्याला नामांकित संस्था आणि उद्योगांचे सहाय्य लाभले आहे. आत्मनिर्भर भारत, स्कील इंडिया आणि डिजिटल इंडिया या दिशेने पडलेले हे महत्वपूर्ण पाऊल आहे, असेही ते म्हणाले. आँटोनाॅमस नॅव्हिगेशन अँड डाटा ऍक्विझिशन या विशिष्ट क्षेत्रातील आंतरविद्यात्मक तंत्रज्ञानाच्या संशोधन आणि विकासावर याचा भर असेल.

आयआयटी हैदराबाद परीसरातील 2 एकर जमीन या प्रकल्पासाठी गठीत केली असून सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. पावसाच्या परीस्थितीचा अंदाज घेण्यासाठी काही खांबांवर स्प्रिंकलर्सची रचना केली असून काही खांब संप्रेषण प्रदान करण्यासाठी सक्षम आहेत. विकसित झालेल्या स्वयंचलित दिशादर्शक यंत्रणेचा भरघोस  लाभ  सर्व उद्योग, संशोधन विकास प्रयोगशाळा, संशोधनआणि विकास करणाऱ्या शैक्षणिक संस्था यांना उपयुक्त ठरेल.

 

S.Tupe/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1684466) Visitor Counter : 97