संरक्षण मंत्रालय

मिशन सागर 3 - आयएनएस किलतानचे कंबोडियाच्या सिंहानौकविले येथे आगमन

Posted On: 29 DEC 2020 5:05PM by PIB Mumbai

 

भारतीय नौदलाच्या वतीने सध्या सुरू असलेल्या मिशन सागर-3 मध्ये आयएनएस किलतान या युद्धनौकेचे आज, दि. 29 डिसेंबर, 2020 रोजी कंबोडियातल्या सिंहानौकविले बंदरामध्ये आगमन झाले. या जहाजामार्फत कंबोडियातल्या पूरग्रस्तांमध्ये मानवतेच्या दृष्टिकोणातून 15 टन आपत्कालिन मदत पुरविण्यात आली. कंबोडियाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीकडे ही मदत सुपूर्त करण्यात आली. या मदतीमुळे कंबोडिया आणि भारत या दोन्ही देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध उभय देशांच्या लोकांना अधिक दृढतेने जोडतील.

मिशन सागर - 3 मोहिमेअंतर्गत कोविड महामारीच्या उद्रेकाच्या काळामध्येही परकीय मित्र देशांना गरजेच्यावेळी मदत करण्याचे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच राबविले आहे. त्यामुळे संपूर्ण जगामध्ये भारत म्हणजे विश्वासार्ह भागीदार म्हणून ओळखला जात आहे. सागर- एसएजीएआर म्हणजेच सर्व क्षेत्रामध्ये सुरक्षा आणि वृद्धी करण्याच्या उद्देशाने ही मोहीम पार पाडण्यात येते. त्यामुळेच आता भारताचा सर्वात प्रथम प्रतिसादकर्ता देश असा परिचय करून दिला जात आहे. असियान देशांमध्येही या मिशनला असलेले महत्व अधोरेखित होत आहे. मित्र राष्ट्रांबरोबर दृढ संबंध निर्माण होत आहेत.

ऐतिहासिक दृष्टीने भारत आणि कंबोडिया यांच्यामध्ये सांस्कृतिक संबंध मजबूत आहेत. गेल्या काही वर्षात सर्व क्षेत्रात झालेल्या गुंतवणूक वृद्धीमुळे उभय देशांमध्ये अधिक दृढ संबंध निर्माण झाले आहेत. या भेटीमुळे दोन्ही देश क्षेत्रीय सुरक्षा आणि स्थैर्य यासाठी सहयोग देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 

M.Iyengar/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1684397) Visitor Counter : 197