संरक्षण मंत्रालय
उदयोन्मुख तंत्रज्ञानातील स्टार्टअप्सना भारतीय लष्कराची साद : आत्मनिर्भरतेला पाठबळ
Posted On:
29 DEC 2020 3:05PM by PIB Mumbai
आत्मनिर्भरतेला पाठबळ देण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण संशोधन व्यवस्थेला चालना देण्यासाठी भारतीय लष्कराने सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स (एसआयडीएम) च्या सहकार्याने उदयोन्मुख तंत्रज्ञानातील स्टार्टअप्ससाठी एक आउटरीच वेबिनार आयोजित केले. 17 ते 28 डिसेंबर 2020 या कालावधीत 89 स्टार्टअपनी आभासी सादरीकरणाच्या माध्यमातून वेबिनार स्वरूपात भारतीय लष्कराला स्वदेशी विकसित नवसंशोधन, कल्पना आणि प्रस्ताव सादर केले.
हे प्रस्ताव ड्रोन्स, काउंटर ड्रोन्स, रोबोटिक्स, स्वायत्त प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), क्वांटम कंप्यूटिंग, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, थ्रीडी प्रिंटिंग, नॅनोटेक्नोलॉजी आणि वैद्यकीय ऍप्लिकेशन्स या विषयांवर केंद्रित होते.
आर्मी डिझाईन ब्युरो (एडीबी) च्या वतीने आयोजित या वेबिनारांना मोठा प्रतिसाद मिळाला आणि भारतीय लष्करासाठी त्यांच्या व्यवहार्यतेच्या आणि वापराच्या आधारे पुढील चाचणीसाठी 13 प्रस्ताव निवडण्यात आले. लष्कर मुख्यालय आणि सैन्य प्रशिक्षण कमांडचे संभाव्य वापरकर्ते आणि तज्ञ या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी बोलताना भारतीय लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एस एस हसबनीस यांनी संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेचे महत्त्व अधोरेखित करुन संरक्षण उद्योग, विशेषत: स्टार्टअप्सना उदयोन्मुख आणि आधुनिक तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. उपप्रमुखांनी स्टार्टअपना आश्वासन दिले की भारतीय लष्कर त्यांना नाविन्यपूर्ण संशोधन आणि तंत्रज्ञान विकसित करण्यात मदत करेल आणि यामुळे लष्कराची परिचालन क्षमता वाढेल.
U.Ujgare/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1684351)
Visitor Counter : 179