रेल्वे मंत्रालय

(डीएफसी) अर्थात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर अखेरच्या मैलापर्यंत जोडणे सुनिश्चित करा - पीयूष गोयल


पीयूष गोयल यांनी आगामी डीएफसीच्या कामाच्या प्रगतीचा घेतला आढावा

Posted On: 28 DEC 2020 10:10PM by PIB Mumbai

 

देशात सुरू करण्यात आलेल्या डीएफसी अर्थात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या कामामध्ये येणा-या सर्व समस्या दूर करून देशात सर्वत्र डीएफसीचे काम वेगाने होईल हे सुनिश्चित करण्यात यावे, असे प्रतिपादन रेल्वे आणि वाणिज्य आणि उद्योग आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी आज सांगितले. त्यांनी आज डीएफसीच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेला. तसेच या कामामध्ये सहभागी असलेल्या सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करून ज्या भागात भू-संपादनाची कामे राहिली आहेत, ती शक्य तितकी लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

 

डीएफसीचे काम वेगाने व्हावे, यासाठी वरिष्ठ अधिका-यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेच्या प्रत्येक प्रकल्पाच्या कामासाठी समर्पित व्यवस्थापकीय पथके स्थापन करण्याचा सल्लाही मंत्री गोयल यांनी यावेळी दिला. अशा पथकांमुळे प्रकल्पाचे काम करताना येणा-या समस्या सोडविणे सोपे जाईल आणि कामाचे प्रभावी परीक्षणही करण्यास मदत होईल, असे गोयल यावेळी म्हणाले.

ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमधल्या न्यू भौपूर ते न्यू खूर्जा विभागातल्या 351 किलोमीटर मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्या  उद्घाटन होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच या संदर्भातल्या इतर कामांची माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी यावेळी दिली.

 

M.Chopade/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1684255) Visitor Counter : 160