संरक्षण मंत्रालय

लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे आजपासून दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर

Posted On: 28 DEC 2020 11:55AM by PIB Mumbai

 

लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे आजपासून तीन दिवसांच्या  दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. 30 डिसेंबर पर्यंतच्या या  दौऱ्यादरम्यान  ते दक्षिण कोरियाच्या वरिष्ठ लष्करी आणि नागरी नेत्यांची भेट घेणार आहेत.

सेउल इथल्या  युद्ध स्मारकावर जनरल नरवणे पुष्पचक्र अर्पण करतील. दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय संरक्षण मंत्री, लष्कर प्रमुख, जॉईंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष आणि  संरक्षण खरेदी कार्यक्रम प्रशासन मंत्री यांची भेट घेऊन भारत- दक्षिण कोरिया संरक्षण संबंध वृद्धींगत करण्याबाबत जनरल नरवणे चर्चा करतील. 

गांगवान प्रांतातल्या इंजे देशातल्या कोरिया युद्ध प्रशिक्षण केंद्राला आणि दाईजेओन इथल्या प्रगत संरक्षण विकास केंद्रालाही ते भेट देणार आहेत.

 

U.Ujgare/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1684075) अभ्यागत कक्ष : 135