रेल्वे मंत्रालय
तिकीट आरक्षण सुलभ करण्यासाठी IRCTC संकेतस्थळावर सर्व वैशिष्ट्ये असणे आवश्यक: पियुष गोयल, रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग व ग्राहकव्यवहार व अन्न व सार्वजनिक वितरण व्यवस्था मंत्री
यूजर पर्सनलायझेशन सुधारण्याच्या तसेच तिकिटांशी निगडीत इंटरनेट संकेतस्थळ सुविधापूर्ण करण्याच्या दृष्टीने सुधारित वैशिष्ट्ये आणि साधी सरळ आखणी यावर रेल्वेचे काम सुरू आहे.
Posted On:
25 DEC 2020 3:58PM by PIB Mumbai
तिकीटींग व्यवस्थेच्या अद्ययावतीकरणासाठी सुरू असलेल्या कामाचा रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग व ग्राहकव्यवहार व अन्न व सार्वजनिक वितरण व्यवस्था मंत्री पियुष गोयल यांनी आज आढावा घेतला. ई-तिकिटींग संकेतस्थळ रेल्वेच्या प्रवाशांसाठी संपूर्णपणे सुविधाजनक अनुभव देणारे असले पाहिजे असे मत पियुष गोयल यांनी यावेळी व्यक्त केले.
बहुसंख्य लोक प्रवासासाठी भारतीय रेल्वेवर अवलंबून असतात. भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऑनलाइन तिकिट आरक्षित करण्याची सुविधा IRCTCचे तिकीटिंग संकेतस्थळ प्रवाशांना देते.
2014 पासून प्रवासातील सोयी-सुविधांसोबतच,तिकीट आरक्षण करणेही अधिक सोयीचे व्हावे यावर भर दिला जात आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांचा संबंध सर्वात प्रथम आय आर सी टी सी च्या संकेतस्थळाशी, यावरून तिकीट आरक्षित करताना येतो, हा अनुभव सुविधापूर्ण आणि सुलभ असायला हवा असे मंत्र्यांनी सांगितले. नवीन डिजिटल भारतामध्ये जास्तीत जास्त लोक तिकिट आरक्षण खिडकीऐवजी, आता तिकीट ऑनलाईन आरक्षित करण्याकडे वळत आहेत. त्यामुळे IRCTCच्या संकेतस्थळाला सातत्याने अद्ययावत राखण्यासाठी दुप्पट परिश्रम घेणे आवश्यक आहे.
रेल्वे बोर्डाचे अधिकारी, CRIS व IRCTC च्या अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना या संकेतस्थळाचे कामकाज अजून सुधारण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
***
G.Chippalkatti/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1683595)
Visitor Counter : 269