उपराष्ट्रपती कार्यालय
ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत कोविड-19 चा रचना बदललेला विषाणू आढळल्यासंदर्भात उपराष्ट्रपतींनी घेतली माहिती
प्रविष्टि तिथि:
24 DEC 2020 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2020
सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजी सीसीएमबीचे संचालक डॉ राकेश मिश्रा यांनी आज हैदराबाद इथे उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांची भेट घेऊन ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत कोविड-19 चा रचना बदललेला विषाणू SARS-Cov-2 आढळल्यासंदर्भात माहिती दिली.
रचना बदललेल्या विषाणूमुळे, सध्या विकसित होत असलेल्या लसीची कार्यक्षमता बदलण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी उपराष्ट्रपतींना सांगितले. हे नवे स्वरूप जास्त संसर्गजन्य असले तरी रुग्णासाठी त्याचे अतिशय वाईट परिणाम झाल्याचे अद्याप आढळून आलेले नाही अशी माहितीही त्यांनी दिली. आहे तेच रोग व्यवस्थापन या नव्या स्वरुपालाही लागू होईल अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
नवे स्वरूप भारतात अस्तित्वात आहे का याविषयी तपास सुरु आहे. SARS-CoV-2 संदर्भात सीसीएमबीने केलेल्या कामाबाबतचे सादरीकरण त्यांनी केले. नव्या स्वरूपातला विषाणू इतर स्वरूपापेक्षा 71% जास्त संसर्गजन्य असल्याची माहिती त्यांनी दिली. याला समांतर असे स्वरूप दक्षिण आफ्रिकेत आढळले असून ते तरुणांवर जास्त परिणाम करणारे आहे, मात्र याबाबत अधिक सखोल संशोधन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
* * *
M.Chopade/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1683391)
आगंतुक पटल : 150