मंत्रिमंडळ

भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान सुधारीत हवाई सेवा करारावर स्वाक्षरी करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी

Posted On: 23 DEC 2020 5:27PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान सुधारीत हवाई सेवा करारावर स्वाक्षरी करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजूरी दिली आहे.

सुधारीत हवाई सेवा करार हा दोन्ही देशांदरम्यानच्या नागरी हवाई वाहतुकीतील महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यायोगे दोन्ही देशांदरम्यान अधिकाधिक व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण आणि नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातील विकासाला चालना मिळणार आहे. यामुळे दोन्ही देशांदरम्यान वर्धित आणि अखंड कनेक्टीव्हीटी निर्माण होणार आहे तसेच दोन्हीकडील हवाई सेवांना व्यापारविषयक संधी प्राप्त होऊन सुरक्षा सुनिश्चित होईल. 

****

M.Chopade/S.Thakur/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1683004) Visitor Counter : 147