पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

पेट्रोलियम मंत्र्यांच्या हस्ते 8व्या (तेल) निर्मिती करणाऱ्या बंगाल खोऱ्याचे- राष्ट्रार्पण

Posted On: 20 DEC 2020 6:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 डिसेंबर 2020


पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आत्मनिर्भर भारताच्या उर्जेची गरज भागविण्याच्या प्रयत्नांचे सबलीकरण करणाऱ्या बंगाल खोऱ्याचे, 8व्या ऊर्जा निर्मिती खोऱ्याचे आज राष्ट्रार्पण केले.

अशोकनगर या भारताने अन्वेषित केलेल्या खोऱ्याचे समर्पण देशाला करताना मंत्री म्हणाले, या शोधामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेला आणि तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रतिबध्दतेला हातभार लागेल. प्रधान यांनी तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाचे (ओएनजीसी) अभिनंदन केले आणि ते म्हणाले की हे  अन्वेषण, गेल्या सात दशकांपासून भारतीय शास्त्रज्ञांनी आणि अभियंत्यांनी केलेल्या अथक परिश्रमांचे फळ असून यामुळे बंगालच्या चौफेर विकासाला चालना मिळेल.

धर्मेंद्र प्रधान म्हणाले, भारत सरकार ओएनजीसीला बंगालच्या खोऱ्यातून अधिकाधिक तेल आणि वायु आणण्यासाठी प्रयत्न करण्यात निर्णायक बिंदू बनून सहकार्य करण्यासाठी कटीबद्ध आहे, यामुळे पश्चिम बंगाल राज्य आणि जनतेसाठी समृध्दीचे नवे दालन खुले करण्यास सहाय्यक ठरेल.

ओएनजीसीने 24 परगणा जिल्ह्यातील अशोकनगर-1 बंगाल खोरे येथील विहिरीतून तेल निर्मितीला आरंभ करत महत्वाचे पाऊल उचलले आहे. अशोकनगर-1 येथील विहीर तेलनिर्मितीची पहिली विहीर म्हणून भारत सरकारच्या जलद उत्पन्न (अर्ली मॉनेटायजेशन) योजनेअंतर्गत पूर्ण झाली. अशोकनगर-1 येथील विहीरीमुळे, यापूर्वी दिनांक 5 नोव्हेंबर 2020 रोजी आयओसीएलच्या हल्दीया तेल शुध्दीकरण प्रकल्पातून प्रथम हायड्रोकार्बनचा शोध घेण्यासाठी विहिरीचे अन्वेषण करण्याची जी मोहीम सुरू केली होती त्याला यश आले. यामुळे ओएनजीसीने तेल अन्वेषणाच्या आणि त्याची निर्मिती करण्याच्या देशातील आठ पैकी सात खोऱ्यांतून एकूण तेल आणि वायु यांच्या संरक्षित साठ्यापैकी 83% शोधकार्य पूर्ण केले आहे.

 

* * *

S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1682239) Visitor Counter : 265