कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे 95व्या फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभाला संबोधित केले
Posted On:
18 DEC 2020 5:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2020
केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सुशासनाचे स्वप्न देशातील नागरी सेवांसाठीच्या मिशन कर्मयोगी आणि आरंभ सारख्या नव्या उपक्रमांमधून प्रतिबिंबित होते. लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे 95 व्या फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभाला संबोधित करताना ते म्हणाले की कोरोना महामारीच्या कठीण काळात झालेल्या प्रशिक्षणाने प्रतिकूल परिस्थितीतून खरे नैतिक आचरण समोर आणले.
या फाउंडेशन अभ्यासक्रमातील एकूण 428 अधिकारी प्रशिक्षणार्थींपैकी 136 म्हणजेच अंदाजे 32% महिला आशेत याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या सहा-सात वर्षांत महिला सक्षमीकरणाला गती मिळाली आहे. या सरकारने आयुष्मान भारत, मृदा आरोग्य पत्रिका किंवा अंतर्देशीय जलमार्ग यासारख्या खास तज्ज्ञांची आवश्यकता असलेल्या अनेक महत्वाकांक्षी योजना सुरू केल्यामुळे अभियांत्रिकी पार्श्वभूमी असलेल्या 245 अधिकाऱ्यांचे अस्तित्व सुशासन पद्धतीला अधिक गती देईल असेही त्यांनी अधोरेखित केले.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, अधिकाऱ्यांना नवभारताचे शिल्पकार होण्याची संधी आहे, ज्याचा पाया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रचला आहे. ते म्हणाले, गेल्या 5 ते 6 वर्षात पंतप्रधानांनी भारतातील नोकरशाहीला नवीन दिशा व मार्ग देण्यासाठी अनेक नवीन उपक्रम आणि संशोधन हाती घेतले. दोन वर्षांपूर्वी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात तीन महिन्यांच्या सहाय्यक सचिव पदाच्या कार्यकाळाने त्यांची क्षमता वाढवण्यात मोठी भर घातली.
ते पुढे म्हणाले, नागरी सेवेतील नोकरदारांना परिवर्तनाचे नेतृत्व करण्यास आणि विभाग आणि क्षेत्रांत अखंडपणे कार्य करण्यास सक्षम बनवण्याच्या दृष्टीने, आरंभ नावाचा कॉमन फाउंडेशन कोर्स (सीएफसी) 2019 मध्ये 94 व्या फाउंडेशन कोर्सचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आला.
* * *
S.Thakur/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1681733)
Visitor Counter : 236