निती आयोग

नीती आयोगाने जारी केले ‘व्हिजन 2035: भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण’

Posted On: 14 DEC 2020 4:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2020


नीती आयोगाने आज ‘व्हिजन 2035: भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण’ या विषयावरील श्वेतपत्रिका काढली. या श्वेतपत्रिकेची उद्दिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :

  • भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था निरीक्षण प्रणाली अधिक उत्तरदायी आणि सूचक व्हावी आणि आवश्यक कृतीसाठी सर्व पातळ्यांवरील तयारी वाढविणे.
  • नागरिक-स्नेही सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीमध्ये  नागरिकांच्या अभिप्रायाची सोय असेल  आणि त्यात प्रत्येकाची व्यक्तिगत गोपनीयता आणि विश्वासार्हता सुनिश्चित राखली जाईल.
  • आजारांचे उत्तम निदान, प्रतिरोध आणि नियंत्रणासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील माहिती आदानप्रदान प्रणाली अधिक सुधारित होईल.
  • जागतिक पातळीवर चिंता निर्माण करणाऱ्या सार्वजनिक आरोग्यविषयक आपत्तींच्या वेळी सर्व परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याचा भारताचा उद्देश साध्य करणे.

नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ.राजीव कुमार, सदस्य (आरोग्य) डॉ.विनोद के.पॉल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि अतिरिक्त सचिव डॉ.राकेश सर्वाल यांनी  ही श्वेतपत्रिका जारी केली.

‘व्हिजन 2035: भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण’ म्हणजे आरोग्य सुविधा प्रणालीच्या सशक्तीकरणाच्या कामाचा पुढचा भाग आहे. कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्यविषयक नोंदी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करणे हा या निरीक्षणाचा मूळ पाया म्हणून वापरून परीक्षणाचे काम मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे व्हिजन 2035 सहायक ठरेल. सार्वजनिक आरोग्य सुविधा निरीक्षण हे आरोग्य सुविधेच्या प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय पातळ्यांना व्यापणारे  महत्त्वाचे कार्य आहे. निरीक्षण म्हणजे ‘कृतीसाठीची माहिती गोळा करणे’

मानव आणि प्राणी यांच्यातील वाढत्या  व्यवहारांमुळे नव्याने उगम पावणाऱ्या आजारांचा नव्याने अभ्यास करण्यासाठी कोविड–19 महामारीने आपल्याला संधी दिली आहे. अशा आजारांची साखळी तोडण्यासाठी आणि लवचिक निरीक्षण प्रणाली निर्माण करण्यासाठी मानव आणि प्राणी यांच्यातील व्यवहारांचे स्वरूप लवकर निश्चित होणे आवश्यक आहे. हे व्हिजन पत्रक त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. ते आरोग्य सुविधेबाबतचे लक्ष्य आणि त्याच्या उभारणीसाठी लागणारे घटक निश्चित करते. प्रत्येकाची व्यक्तिगत गोपनीयता आणि विश्वासार्हता सुरक्षित राखून व्यक्तिगत, सामाजिक, आरोग्य सेवा सुविधा किंवा प्रयोगशाळा अशा सर्व पातळ्यांवरील सर्व सहभागींना सामावून घेणारी नागरिक-स्नेही सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीचे दर्शन घडविते.

ही श्वेतपत्रिका, भारताच्या व्हिजन 2035 द्वारे भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेच्या निरीक्षणाद्वारे तीन पातळ्यांच्या सार्वजनिक आरोग्य सुविधा प्रणालीचे आयुष्मान भारत अभियानातील एकात्मीकरण दाखविते.त्यातून विस्तारित संदर्भ जाळे आणि प्रयोगशाळांची क्षमता वाढविणे यांची गरज प्रतीत होते. यासाठीचे बांधणी घटक म्हणजे एकमेकांवर अवलंबून असलेली केंद्र आणि राज्य सरकारांमधील उत्तम प्रणाली, माहितीच्या आदानप्रदानासाठी नव्या विश्लेषणांचा वापर करणारी नवीन यंत्रणा, आरोग्यविषयक माहिती आणि माहिती विज्ञान तसेच योग्य कृतीसाठी आवश्यक माहितीचे प्रसारण करण्यासाठी अभिनव पद्धती.

आज जारी केलेली पत्रिका भारतातील सार्वजनिक आरोग्य सुविधा प्रणाली अधिक उत्तमरीत्या चालविण्यासाठी आणि या क्षेत्रात देशाला जागतिक पातळीवर नेता म्हणून प्रस्थापित करण्यासाठी द्रष्टा दस्तऐवज म्हणून काम करेल.

या श्वेतपत्रिकेचा संपूर्ण मसुदा वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

M.Chopade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1680558) Visitor Counter : 382