उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींनी 2001 मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना वाहिली श्रध्दांजली


दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या राजकीय आणि अ-राजकीय घटकांना वेगळे काढण्याचे जागतिक समुदायाला आवाहन

Posted On: 13 DEC 2020 8:24PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू आज म्हणाले, की दहशतवाद हा आजच्या संस्कृतीतील लोकशाही, वैयक्तीक स्वातंत्र्य आणि जागतिक आर्थिक समृध्दी या महत्वपूर्ण मूल्यांवरचा गंभीर घाला आहे. 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यानिमित्त फेसबुक पोस्टमध्ये लिहिताना उपराष्ट्रपती म्हणाले, की 13 डिसेंबर हा दिवस दहशतवाद्यांचे संकट, लोकशाही मूल्ये आणि आर्थिक आकांक्षा यांच्याशी उघडपणे असलेल्या वैराची पूर्णपणे आठवण करून देणारा दिवस आहे.

उपराष्ट्रपती म्हणाले, संसदेच्या सभागृहाच्या रक्षणासाठी ज्या संरक्षण अधिकाऱ्यांनी, आपले बलिदान दिले ते सर्व देशवासियांच्या मनात कायमचे कोरलेले राहील.

दहशतवादी ज्यांच्या प्रथम दृष्टीस पडले आणि त्यांच्या हालचालींचा मागोवा आणि माहिती मिळविणाऱ्या सीपीआरएफच्या कॉन्स्टेबल कमलेश कुमारी यांच्या धैर्याचे कौतुक करत उपराष्ट्रपती म्हणाले, की त्यांच्या धाडसामुळे अतिरेक्यांचा डाव उधळला.

उपराष्ट्रपतींनी पुढे लिहिले की, भारतीय लोकशाहीच्या मंदिरावरील हल्ल्यासाठी आपल्या शेजाऱ्याने मार्गदर्शन केल्याने झालेल्या या हल्ल्याने जगाला हादरविले आणि संसदेच्या इमारतीचे रक्षण करणाऱ्या सावध आणि समर्थ सुरक्षा अधिकाऱ्यांमुळे मोठी आपत्ती टळली.

त्याचवर्षी जागतिक व्यापार केंद्रावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत उपराष्ट्रपती म्हणाले, की या सहस्त्रकाच्या पहिल्या वर्षी भारत आणि अमेरिका या लोकप्रिय लोकशाही देशांवर मोठे संकट आले होते. उपराष्ट्रपतींनी इशारा दिला की दहशतवादाचा एकमेव कार्यक्रम लोकशाहीला भग्न करणे आणि जगाचे आर्थिक अस्तर नष्ट करून मानवतेला अंधार युगात ढकलणे हा असतो.

प्रभावी आणि सामूहिक जागतिक कृतीद्वारे अशा अत्यंत नीच प्रवृत्तींना नष्ट करण्याचे आवाहन करत नायडू म्हणाले, की दहशतवादाचे समर्थन करणारे राजकीय आणि अ-राजकीय घटक जे राज्याच्या संकुचित धोरणांसाठी दहशतवादाला सहाय्य करतात अशांना जागतिक समुदायाने वेगळे काढून त्यांचे वर्तन सुधारायला सांगितले पाहिजे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवादाच्या विरोधातील भारताच्या प्रस्तावाकडे लक्ष वेधत उपराष्ट्रपती म्हणाले, की विविध खंडांतील अनेक देश भारताच्या याबाबतच्या आवाजाचे समर्थन करतात. तथापि असेही काही देश आहेत ज्यांना दहशतवादाच्या धोक्याची संकुचित भू- राजकीय आणि आर्थिक दृष्टीकोनातून जाणीव नसते आणि दहशतवादाचे संकट एकत्रितपणे रोखले नाही तर सरतेशेवटी प्रत्येकाला हार मानावी लागेल, असे उपराष्ट्रपतींनी आपल्या पोस्टमधे लिहिले आहे.

***

S.Thakur/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1680446) Visitor Counter : 207