आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

वैश्विक आरोग्यसेवा दिनी 1,153 प्राथमिक आरोग्य सेवा कामगारांचा सत्कार


डॉ. हर्ष वर्धन यांनी 17 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशांसाठी 5वा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाल (एनएफएचएस) जाहीर केला

Posted On: 12 DEC 2020 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 डिसेंबर 2020

 

वैश्विक आरोग्य दिनाचे औचित्य साधत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की कोविड-19 ने संवेदनक्षम आरोग्य सेवा तयार करून सर्वांनाच ती समान मार्गाने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता वृद्धिंगत केली आहे. “आपण —आता आणि भविष्यात प्रत्येकाचे संरक्षण करणारी मजबूत आरोग्य यंत्रणा विकसित केली पाहिजे. वैश्विक आरोग्य कव्हरेज प्रदान करण्यासाठी एक मजबूत मॉडेल विकसित करून ते जागतिक स्तरावर पोहोचविण्याची क्षमता भारतामध्ये आहे, यावर माझा विश्वास आहे.”

ते म्हणाले, "2018 मध्ये सुरू केलेल्या 'आयुष्मान भारत' कार्यक्रमात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर जोरदार लक्ष केंद्रित केले आहे त्यामुळे देशात प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीयक आरोग्य सेवा प्रणालीमध्ये महत्वपूर्ण क्रांती घडली आहे.” आयुष्मान भारतच्या, आरोग्य व निरामय केंद्रे (एचडब्ल्यूसी) आणि पंतप्रधान जन आरोग्य योजना (पीएमजेवाय) या दोन विभागांच्या माध्यमातून सरकार देशातील कोट्यवधी लोकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्यसेवा  उपलब्ध करुन देत आहे.

 DSC_6611.JPG

आतापर्यंत 51,500 केंद्रांवर 30 कोटी लोकांची नोंद झाली आहे. एचडब्ल्यूसीच्या माध्यमातून आतापर्यंत 6..89 कोटीहून अधिक लोकांची उच्च रक्तदाबासाठी तपासणी करण्यात आली असून 5.62 कोटीहून अधिक लोकांची मधुमेहाची तपासणी करण्यात आली आहे. एबी-पीएमजेवाय अंतर्गत अत्याधिक गरीब नागरिकांना 1.45 कोटीहून अधिक रोकड विरहित उपचार प्रदान केले  आहेत.

डॉ. हर्ष वर्धन यांनी प्रसंगी विविध आरोग्यविषयक कार्यक्रमांच्या अंमलबजावणी व देखरेखीसाठी काही  अॅप्स आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या :

  • एसडीजी-3 आरोग्य डॅशबोर्ड 2030 पर्यंत शाश्वत विकास लक्ष्ये साध्य करण्यासाठी आवश्यक असलेली महत्त्वपूर्ण प्राधान्य क्षेत्रे ओळखण्यास मदत करेल.
  • आरोग्य आणि कल्याण केंद्रांच्या संचालनाचे संकलन, जे मागील दोन वर्षात देशभरातील आरोग्य आणि कल्याण केंद्राच्या संचालनामध्ये झालेल्या प्रगती आणि कामगिरीचा आढावा देते.
  • कोविड-19 विरुद्धच्या लढाईत आघाडीवर काम करणाऱ्या प्राथमिक आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना डॉ. हर्षवर्धन यांनी सलाम केला. त्यांनी राज्यांनी नामांकित केलेल्या 1153 प्राथमिक आरोग्य सेवा कर्मचार्‍यांचा आभासी पद्धतीने सत्कार केला.

डॉ. हर्ष वर्धन यांनी 5 वा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाल (एनएफएचएस) देखील प्रसिद्ध केला ज्यामध्ये भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या, आरोग्य आणि पोषण याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. सध्याच्या एनएफएचएसमध्ये लोकसंख्या, आरोग्य, कुटुंब नियोजन आणि पोषण संबंधी संकेतकांची माहिती गोळा करण्यासाठी 6.1 लाख कुटुंबांची माहिती घेण्यात आली आहे. महाराष्ट्रासह 17 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशांचे निकाल आता दुसऱ्या टप्प्यात जाहीर करण्यात आले आहेत. उर्वरित 12 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेला दुसरा टप्पा मे 2021 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

 

सध्याच्या एनएफएचएस-4 सर्वेक्षणात (2015-16 ) मध्ये माता व बाल आरोग्य निर्देशकांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा नोंदविण्यात आली आहे. प्रजनन दरात आणखी घट झाली आहे, गर्भ निरोधकांचा वापर वाढला आहे आणि बहुतेक टप्प्यातील राज्यांमधील अत्यावश्यक गरज कमी झाली आहे. सर्व राज्यांमध्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये 12-23 महिने वयोगटातील मुलांमध्ये लसीकरणाच्या व्याप्तीत लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. महिलांच्या सशक्तीकरण निर्देशांकात (महिलांच्या बँक खात्यासह) देखील बरीच प्रगती दर्शविली आहे.

कठोर मेहनत करून सार्वत्रिक आरोग्य सेवा पुरविणाऱ्या कामगिरीबद्दल उपस्थितांचे अभिनंदन करत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे म्हणाले की, साथीच्या रोगात आयुष्मान भारत-आरोग्य आणि कल्याण केंद्र ( AB-HWCs) प्रणालीतील लोकांची झालेली नोंद ही या प्रणालीच्या लवचिकतेची साक्ष आहे.

* * *

S.Thakur/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1680258) Visitor Counter : 419