वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

पीयूष गोयल यांनी फिक्कीच्या वार्षिक परिषदेला आणि 93व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित केले


गुणवत्ता आणि पूर्ण उत्पादन क्षमतेसह उत्पादन करण्याचे प्रमाण वाढते राखणे भारताला खऱ्याअर्थाने स्पर्धात्मक बनवू शकते : गोयल

Posted On: 12 DEC 2020 5:29PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 डिसेंबर 2020


केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज फिक्कीच्या वार्षिक परिषदेला आणि 93 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला  संबोधित केले. गोयल यांनी सांगितले की गुणवत्ता आणि पूर्ण उत्पादनक्षमतेसह उत्पादन करण्याचे प्रमाण वाढते राखणे भारताला खऱ्याअर्थाने स्पर्धात्मक बनवू शकेल आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास मदत करेल.

गोयल म्हणाले की, ज्या क्षेत्रांमध्ये स्पर्धात्मक व तुलनात्मक फायदे आहेत, जिथे आपण जागतिक उद्योजक बनू शकू आणि जागतिक व्यापारात मोठ्या प्रमाणात योगदान देऊ शकू अशा क्षेत्रांची आम्ही निवड करत आहोत. “येत्याकाही वर्षांमध्ये टायर व रबर उद्योग व्यवस्था एक आघाडीचा व्यवसाय बनू शकेल. आम्ही खाजगी गुंतवणूकीच्या सहाय्याने रबर लागवडीस प्रोत्साहन देणार असून टायर उद्योगाची वाढ आणि भरभराट होण्यासाठी सरकार या उद्योगाला पुरेसे पाठबळ देईल. आम्ही आणखी 24 क्षेत्रांची ओळख पटविली आहे, ज्यात उद्योजक काम करत आहेत, जे पुढील दहा वर्षांत भारतातील उत्पादन क्षमतेत सुमारे 200 लाख कोटी रुपयांच्या उत्पादनाचा समावेश करण्यासाठी कृतीशील विषयसूचीवर एकत्र येऊन काम करत आहेत.”

गोयल म्हणाले की स्टार्टअप्स आणि स्टार्टअप्सची पारिस्थितिक व्यवस्था नवीन आणि तरूण उद्योजकांना प्रोत्साहन देऊन त्यांना सामर्थ्यवान बनवत आहेत. गोयल यांनी भारतीय उद्योगांना स्टार्टअप्सना आर्थिक पाठबळ, सहाय्य, संधी आणि मार्गदर्शन देण्याची विनंती केली जेणेकरून त्यांचा विकास होईल.

अनुपालन, मान्यता प्रक्रिया सुलभतेच्या दृष्टीने आम्ही सर्वात पहिली एकल खिडकी प्रणाली  तयार करण्यासाठी कठोर परिश्रम करीत आहोत असे गोयल म्हणाले.

मंत्री म्हणाले की, ब्रँड इंडिया उपक्रम ही एक अशी कल्पना आहे जिथे सरकार आणि उद्योग भागीदारीमध्ये काम  करतील आणि मेक इन इंडिया व एकूणच ब्रँड इंडिया दोन्ही विकसित करतील. “आता वेळ आली आहे की भारत जगासमोर आपले अव्वल स्थान आणि गुणवत्तेप्रती असलेली  वचनबद्धता दाखवून देईल. एकदा एखादे उत्पादन भारतीय ब्रॅन्ड झाले की त्याची ओळख, ते उत्कृष्ट दर्जाचे आहे, हे जगासमोर आले पाहिजे. ब्रँड इंडिया उपक्रमांतर्गत, आम्ही आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे भारत आणि भारतात बनवल्या जाणार्‍या उत्पादनांबद्दल  प्रबोधन करून. ”

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी वचनबद्ध असल्याचे सांगून पीयूष गोयल यांनी फिक्कीशी संबंधित सर्व उद्योजक आणि विचारवंतांना शेती कायद्याच्या फायद्यांविषयी बोलण्याचे आवाहन केले कारण हे कायदे देशभरातील सर्व शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. पूर्वीच्या यंत्रणेत बदल न करता या कायद्यांमुळे शेतकर्‍यांना व्यापार आणि व्यवसाय करण्याच्या नवीन संधी मिळतील. यामुळे ग्रामीण भारतात अधिक गुंतवणूक येईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असे ते म्हणाले.


* * *

G.Chippalkatti/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1680233) Visitor Counter : 88