रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा रस्ते विकास क्षेत्रातील सहकार्यासंबंधी ऑस्ट्रियासोबत सामंजस्य करार
Posted On:
09 DEC 2020 7:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 9 डिसेंबर 2020
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ऑस्ट्रियाच्या हवामानबदल कृती, पर्यावरण, ऊर्जा, वाहतूक, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान मंत्रालयासमवेत रस्ते पायाभूत क्षेत्रातील तंत्रज्ञान सहकार्याविषयी आज परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
रस्ते वाहतूक, रस्ते/ महामार्ग पायाभूत सुविधा विकास, व्यवस्थापन आणि प्रशासन, रस्ते सुरक्षा आणि दोन्ही देशांमधील इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टिम या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्यासाठी प्रभावी चौकट तयार करण्याचे सामंजस्य कराराचे उद्दीष्ट आहे. तसेच यामुळे दोन्ही देशांतील संबंध आणखी मजबूत होतील, दीर्घकालीन द्विपक्षीय संबंधांना चालना मिळेल आणि दोन्ही देशांतील परस्पर व्यापार वाढेल.
1949 मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध स्थापन झाल्यापासून ऑस्ट्रियाबरोबर भारताचे चांगले परराष्ट्र संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण आर्थिक आणि परराष्ट्र संबंधांचा इतिहास आहे. ऑस्ट्रियाकडे इलेक्ट्रॉनिक टोल प्रणाली, गुणवत्तापूर्ण वाहतूक प्रणाली, रहदारी व्यवस्थापन प्रणाली, बोगदा नियंत्रण प्रणाली, जिओ-मॅपिंग आणि भूस्खलन संरक्षण उपाय असे रस्ते आणि महामार्गासंबंधीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. रस्ते वाहतूक क्षेत्रामध्ये भारत-ऑस्ट्रिया द्विपक्षीय सहकार्य वाढीव रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तसेच या क्षेत्रासाठी आकर्षक अर्थसंकल्पीय दोहोंच्या दृष्टीकोनातून फायदेशीर ठरेल, जेणेकरून या सामंजस्य कराराद्वारे दोन्ही देशांमधील पूर्वीपासून असलेले चांगले संबंध अधिक दृढ होतील.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के.सी.गुप्ता आणि ऑस्ट्रियाचे राजदूत ब्रिजिट ओपिंगर-वॉल्शोफर यांनी परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
* * *
G.Chippalkatti/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1679501)
Visitor Counter : 126