आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात सक्रीय रुग्णांची संख्या कमी होत 3.78 लाखांपेक्षा खाली, एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 4% हून कमी


दररोजच्या रुग्णमुक्तीचा दर 3.14%

19 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील दर आठवड्याचा पाॅझिटीव्ह रुग्णांचा दर राष्ट्रीय सरासरी पेक्षा जास्त

Posted On: 09 DEC 2020 5:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 9 डिसेंबर 2020  


भारतात सक्रीय रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत रहाण्याचा कल कायम राहिला आहे. देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 3,78,909 इतकी आहे. एकूण पाॅझिटीव्ह रुग्णांपैकी सक्रीय रुग्णांची संख्या ही आणखी कमी होऊन तो दर आता 3.89% इतका झाला आहे.

दररोज उपचारांनंतर बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येपेक्षा दररोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने, सक्रीय रुग्णसंख्या कमी झाल्याचे सुनिश्चित झाले आहे. गेल्या 24 तासांत सक्रीय रुग्णसंख्या एकूण 4,957 ने कमी झाली आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0017SOQ.jpg

गेल्या 24 तासांत भारतात बरे झालेल्या रुग्णांची संख्या दररोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा  कमी झाली असल्याची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 32,080 नवे रूग्ण आढळून आले तर तेवढ्याच कालावधीत  बरे झालेल्या रुग्णांची संख्या 36,635 इतकी आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002PV5N.jpg

चाचण्यांची एकूण संख्या जवळपास 15 कोटी (14,98,36,767) इतकी झाली आहे. दररोज दहा लाखांपेक्षा जास्त चाचण्या पूर्ण करण्याचे आपले ध्येय गाठत, गेल्या 24 तासांत 10,22,712 चाचण्या पूर्ण झाल्या. देशाची चाचणी संख्या वाढत जात ती आता दररोज 15 लाख  इतकी झाली आहे.

देशात प्रयोगशाळांच्या मूलभूत सुविधेत कमालीची वाढ झाली असून सध्या 2,220 प्रयोगशाळा कार्यरत आहेत.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003RDF2.jpg

दररोज दहा लाख चाचण्या करण्यात येत असल्यामुळे एकूण पाॉझिटीव्ह रुग्णांचा दर सातत्याने कमी होत असून तो सध्या झपाट्याने  खाली उतरत आहे.

एकूण राष्ट्रीय पाॅझिटीव्हीटीचा दर आज 6.50% इतका आढळून आला. रोजचा पाॅझिटीव्ह दर केवळ 3.14% इतका आहे. चाचण्यांचे प्रमाण अधिक असणे याचा अर्थ एकूण पाॅझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण कमी आहे असा होतो.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004QDTF.jpg

19 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील दर आठवड्याचा पाॅझिटीव्ह रुग्णांचा दर राष्ट्रीय सरासरी पेक्षा जास्त आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005RB45.jpg

खालील राज्यांतील एकूण चाचण्यांची संख्या आणि पाॅझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण पुढे दिले आहे.

उत्तरप्रदेशात सर्वाधिक म्हणजे 2 कोटी चाचण्या करण्यात आल्या. बिहार, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, आणि आंध्रप्रदेश ही आणखी काही राज्ये ज्यात  एकूण चाचण्यांची संख्या 1 कोटीपेक्षा आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006BYIF.jpg

रुग्ण बरे होण्याचा दर आता वाढून 94.66%इतका झाला आहे.आज 92 लाखांपेक्षा जास्त(92,15,581) रुग्ण बरे झाले आहेत. 

बरे झालेल्या रुग्णांपैकी 76.37% रुग्ण हे 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील आहेत. महाराष्ट्रात एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येची नोंद झाली असून 6,365 रुग्ण नव्याने बरे झाले आहेत.गेल्या 24 तासांत केरळमध्ये 4,735 रुग्ण बरे झाले असून त्यापाठोपाठ दिल्लीत 3,307 रुग्ण बरे झाले आहेत.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0078GZT.jpg

75.11% नव्याने आढळून आलेले रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.

केरळमध्ये नव्याने नोंद झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असून ती 5,032 इतकी आहे. त्याखालोखाल महाराष्ट्रात 4,026 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image008QQWH.jpg

गेल्या 24  तासांत 402 रुग्णांचा मृत्यू झाला.

10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत  मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 76.37% इतकी आहे. दिल्लीत सर्वाधिक रूग्ण मृत्यूमुखी(57 )पडले  आहेत. त्या खालोखाल महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल मधे अनुक्रमे 53 आणि  49 रुग्णांचा मृत्यू झाला.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image009M9WX.jpg

 

* * *

G.Chippalkatti/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1679384) Visitor Counter : 276