वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

‘इन्व्हेस्ट इंडिया’ ला संयुक्त राष्ट्रसंघाचा गुंतवणूक प्रोत्साहन पुरस्कार-2020 जाहीर

Posted On: 07 DEC 2020 9:03PM by PIB Mumbai

 

संयुक्त राष्ट्रांनी (UNCTAD) ‘इन्व्हेस्ट इंडियाया उपक्रमाला संयुक्त राष्ट्रांचा यंदाचा गुंतवणूक प्रोत्साहन पुरस्कार जाहीर केला. जिनेव्हा इथे UNCTAD च्या मुख्यालयात आज हा पुरस्कार समारंभ झाला.

जगातील सर्वोत्तम गुंतवणूक संस्थांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार देऊन गौरवलं जातं. जगातील 180 देशांच्या राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन संस्थांनी केलेल्या कामांचे मूल्यांकन करत त्यातून  UNCTAD ने भारतीय संस्थेची निवड केली आहे.

कोविड-19 मुळे गुंतवणूक प्रोत्साहन संस्थांसमोर मोठी आव्हाने उभी केली होती, ज्यामुळे या संस्थांना आपले लक्ष्य नेहमीच्या गुंतवणूक प्रोत्साहन व्यवस्थेकडून वळवत, संकट व्यवस्थापन सुविधा, सरकारी आपत्कालीन अधिसूचना आणि वित्तीय उपाययोजना, संकटाचा सामना करण्यासाठीच्या सेवा, आणि कोविड च्या संकटाला प्रतिसाद देण्यासाठीच्या प्रयत्नात योगदान, अशा सगळ्या बाबींकडे द्यावे लागले. या काळात कोविडच्या न्यू नॉर्मल परिस्थितीतच ही कामे या संस्थांना करावी लागली. मार्च महिन्यात UNCTAD ने कोविडला सर्व गुंतवणूक प्रोत्साहन संस्था कसा प्रतिसाद देतात, यावर देखरेख ठेवण्यासाठी एक पथक नेमले. यात, सर्वोत्तम प्रतिसाद देणाऱ्या आयपीए ची निरीक्षणे प्रसिध्द केली. या आधारावरच या पुरस्काराची निवड करण्यात आली.

इन्व्हेस्ट इंडियाने केलेल्या अभिनव उपक्रमांची माहिती UNCTAD ने दिली आहे. यात बिझनेस इम्युनिटी प्लॅटफॉर्म, एक्स्लुझिव्ह इन्व्हेस्टमेंट फोरम, समाज माध्यमांवर केलेले उपक्रम अशा उपक्रमांचा उल्लेख आहे.गुंतवणूक प्रोत्साहनासाठी  इन्व्हेस्ट इंडिया ने जी दीर्घकालीन धोरणे आणि उपक्रम राबवले, त्यांचीही चर्चा UNCTAD उच्चस्तरीय बैठकीत झाली.

गुंतवणूक प्रोत्साहन संस्थांच्या क्षेत्रात संयुक्त राष्ट्रांचा हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठीत समजला जातो.

हा पुरस्कार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारताला जगातील गुंतवणुकीचे सर्वोत्तम केंद्र बनवण्याच्या उद्देशाने केलेल्या प्रयत्नांचा परिपाक आहेअसे मत, इन्व्हेस्ट इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बागला यांनी व्यक्त केले.

*****

M.Chopade/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1678944) Visitor Counter : 155