विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

डॉ. हर्ष वर्धन यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत सीएसआयआर -आयएमएमटी भुवनेश्वर येथील आंतरराष्ट्रीय भारतीय विज्ञान उत्सवाच्या CSIR-IMMT ( IISF 2020) कार्यक्रमाचे केले ई-उद्‌घाटन


“गेली शेकडो वर्षे भारत कशाप्रकारे नवनवीन विचार, संकल्पना आणि योजनांना उत्तेजन देण्यासाठी जगाला प्रेरणा देत आहे, याची शिकवण आयआयएसएफ सध्याच्या पिढीला देत आहे. या त्यांच्या प्रयत्नांमुळे भारताला विश्वगुरू बनविण्याच्या वाटचालीसाठी ऊर्जा मिळेल- डॉ. हर्ष वर्धन

Posted On: 05 DEC 2020 7:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  5 डिसेंबर 2020

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी सीएसआयआर -आयएमएमटी, भुवनेश्वर येथे, 6 व्या आंतरराष्ट्रीय भारत विज्ञान उत्सव 2020 च्या (IISF 2020) प्रारंभिक कार्यक्रमाचे ई- उद्‌घाटन केले. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) सचिव डॉ. शेखर सी. मांडे, वैज्ञानिक आणि  औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) संचालक प्राध्यापक डॉ. सुधासत्व बसू, हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान आणि जागतिक समृध्दी’ ही आंतरराष्ट्रीय भारतीय विज्ञान उत्सव 2020 च्या (IISF 2020) कार्यक्रमाची संकल्पना आहे.

द्‌घाटनाच्या भाषणात बोलताना डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, आत्मनिर्भर भारत आणि जागतिक समृध्दी ही आंतरराष्ट्रीय भारतीय विज्ञान उत्सव 2020 (IISF 2020) या कार्यक्रमाची संकल्पना आजच्या काळाशी अतिशय सुसंगत आहे, ज्यावेळी राष्ट्र विकास आणि प्रगतीसाठी विज्ञानाकडे पाहत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मनिर्भर भारताचा दृष्टीकोन ज्यावेळी जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या समाजातील विविध घटकांना सहभागी करणारा  आयआयएसएफ  हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उत्सव आहे आणि तो विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित आपले जीवन सुधारण्यासाठी कसे उपयोगी पडतात हे दर्शवित असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. इतर देशांना भारत गेली कित्येक शतकानुशतके नवे विचार, संकल्पना, आणि नवनिर्माणाच्या योजनांसाठी कशाप्रकारे प्रेरणा देत राहिला, याची शिकवण हा उत्सव सध्याच्या पिढीला देत राहिला आहे. या प्रयत्नांमुळे भारताच्या विश्वगुरू बनण्याच्या वाटचालीसाठी ऊर्जा मिळत आहे. आयआयएसएफला मोठे यश लाभो आणि आपली उद्दिष्टे गाठण्यात यशस्वी होवो, तसेच त्यात समाजातील सर्व घटकांचा प्रतिसाद लाभो, अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

धर्मेंद्र प्रधान यांनी वैज्ञानिक समुदायाला, भारतासाठी नवनिर्मिती करा आणि  आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी स्पर्धात्मक लाभ मिळवून द्या तसेच जगातील सर्वोत्तम वस्तूंशी स्पर्धा करू शकतील अशी उत्तम उत्पादने आणि सेवा उपलब्ध करा, असे आवाहन यावेळी केले. विज्ञान आणि नवनिर्माण यांचे समाजाच्या विकासासाठी असलेले महत्त्व विशद करीत धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, आपले सर्व क्षेत्रातील शास्त्रीय ज्ञान आणि नवनिर्मिती हे आपल्या संस्थागत आणि औद्योगिक सामर्थ्य यांचा विकास आणि सबलीकरण करण्यासाठी आवश्यक आहे, हे कोविड-19 महामारीने आपल्याला पुन्हा एकदा दाखवून दिले.

भारताचा समृध्द वारसा हा प्रगत शास्त्रीय संकल्पना आणि आधुनिक गणिती शास्त्रीय पद्धतीने संकलीत करत या पध्दतींमागील अनेक रहस्ये उलगडून दाखवावीत आणि ती शास्त्रीय दृष्ट्या सिध्द करावीत, असे आवाहन त्यांनी वैज्ञानिक समुदायाला केले.

आपल्या भाषणात डॉ. शेखर सी. मांडे म्हणाले की, आयआयएसएफ 2020 च्या उत्सवाचे हे 6 वे वर्ष आहे आणि आपल्या विज्ञान भारती या उपक्रमाद्वारे विज्ञानाचा प्रसार करणे, हे त्यांचे ध्येय आहे. सीएसआयआरने वैज्ञानिक आणि औषधनिर्माण उत्पादनांच्या निर्मितीसाठी अनेक प्रमुख भारतीय कंपन्यांशी भागीदारी केल्याची माहिती त्यांनी दिली.

 

S.Thakur/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1678604) Visitor Counter : 300