जलशक्ती मंत्रालय

देशातील 128 जलाशयांतील पाणीसाठ्याची स्थिती

Posted On: 04 DEC 2020 7:00PM by PIB Mumbai

 

केंद्रीय जल आयोग देशातील 128 जलाशयांमधील पाणीसाठ्यावर साप्ताहिक स्वरूपात देखरेख करत आहे. या  जलाशयांपैकी  44  जलाशयांमधून 60 मेगावॅटहून अधिक स्थापित क्षमतेची जलविद्युत निर्मिती होते.  या  128 जलाशयांची एकूण जलसाठा क्षमता 172.132 बीसीएम आहे जी देशभरातील अंदाजित पाणीसाठयाच्या अंदाजे  66.77 टक्के आहे. 3 डिसेंबर 2020 रोजी जारी करण्यात आलेल्या  जलाशय साठा अहवाला अनुसार, या जलाशयांमध्ये सध्या 136.866 बीसीएम पाणीसाठा आहे जो एकूण क्षमतेच्या 80% आहे. गेल्या वर्षी याच  काळात हा पाणीसाठा 146.439 बीसीएम होता आणि मागील 10 वर्षांतील पाणीसाठा 114.439 बीसीएम होता. अशा प्रकारे 3 डिसेंबर 2020 रोजी जारी  अहवाला अनुसार, 128 जलाशयांमध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 94% आणि गेल्या दहा वर्षांच्या सरासरी साठयाच्या तुलनेत 120% जलसाठा आहे. प्रदेशानुसार जलसाठा स्थितीचा तपशील खालीलप्रमाणे आहेः

उत्तर क्षेत्रामध्ये हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थानचा समावेश आहे.  सीडब्ल्यूसीच्या देखरेखीअंतर्गत  8 जलाशय येतात. त्यांची पाणीसाठा क्षमता 19.17 बीसीएम आहे. 3 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या जलाशय अहवाला अनुसार, या जलाशयांमध्ये सध्या 10.66 बीसीएम पाणीसाठा आहे जो एकूण क्षमतेच्या 56 टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा 78 टक्के होता.

पूर्व क्षेत्रामध्ये ओदिशा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि नागालँडचा समावेश आहे.  सीडब्ल्यूसीच्या देखरेखीअंतर्गत  19 जलाशय येतात. त्यांची पाणीसाठा क्षमता 19.65 बीसीएम आहे. 3 डिसेंबर 2020 रोजीजाहीर केलेल्या जलाशय अहवाला अनुसार, या जलाशयांमध्ये सध्या  13.90 बीसीएम पाणीसाठा आहे जो एकूण क्षमतेच्या 71 टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा  78 टक्के होता.

पश्चिम क्षेत्रांमध्ये गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचा समावेश आहे.  सीडब्ल्यूसीच्या देखरेखीअंतर्गत  42 जलाशय येतात. त्यांची पाणीसाठा क्षमता 35.24 बीसीएम आहे. 3 डिसेंबर 2020 रोजीजाहीर केलेल्या जलाशय अहवाला अनुसार, या जलाशयांमध्ये सध्या 31.39 बीसीएम पाणीसाठा आहे जो एकूण क्षमतेच्या 89 टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा  94 टक्के होता.

मध्य क्षेत्रामध्ये उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडचा समावेश आहे.  सीडब्ल्यूसीच्या देखरेखीअंतर्गत  23 जलाशय येतात. त्यांची पाणीसाठा क्षमता 45.27 बीसीएम आहे. 3 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या जलाशय अहवाला अनुसार, या जलाशयांमध्ये सध्या  37.64 बीसीएम पाणीसाठा आहे जो एकूण क्षमतेच्या 83 टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा  86 टक्के होता.

दक्षिण  क्षेत्रामध्ये आंध्रप्रदेश, तेलंगणा (दोन्ही राज्यात 2 संयुक्त प्रकल्प), कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूचा समावेश आहे.  सीडब्ल्यूसीच्या देखरेखीअंतर्गत  36 जलाशय येतात. त्यांची पाणीसाठा क्षमता 52.81 बीसीएम आहे. 3 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या जलाशय अहवाला अनुसार, या जलाशयांमध्ये सध्या 43.28 बीसीएम पाणीसाठा आहे जो एकूण क्षमतेच्या 82 टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा  83 टक्के होता.

******

S.Thakur/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1678380) Visitor Counter : 148