युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी ब्रिक्स युवा शिखर परिषदेला केले संबोधित; कोविड 19 दरम्यान भारतीय युवा स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचा केला उल्लेख

Posted On: 02 DEC 2020 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  2 डिसेंबर 2020

केंद्रीय युवक कल्याण  आणि  क्रीडा मंत्री  किरेन रिजिजू यांनी मंगळवारी आभासी कार्यक्रमाच्या माध्यमातून सहावी ब्रिक्स युवा शिखर परिषद तसेच ब्रिक्स मंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला. या प्रसंगी बोलताना रिजीजू यांनी सध्याच्या कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी  जगभरातील युवकांच्या योगदानाच्या महत्वावर भर  दिला.

जागतिक मंचावर  भारताचे उदाहरण देताना  रिजीजू म्हणाले, आज आपल्या जगाच्या या गंभीर वास्तवात,  संपूर्ण जग थांबले होते,  अशा प्रतिकूल स्थितीत,  युवक ,  तरुण पुरुष आणि स्त्रियांनी लोकांना सुरक्षितता, सुरक्षा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रगती आणि आशेकडे  नेले. एकट्या भारतात, कोविड-19 ने निर्माण केलेल्या धोक्याचा सामना करण्यासाठी दहा लाखांहून  अधिक स्वयंसेवक पुढे आले आणि महामारीनंतरचे परिणाम कमी करण्यास मदत केली.

नेहरू युवा केंद्र संघटना (एनवायकेएस), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), भारत स्काऊट्स आणि गाईड्सचे  युवा स्वयंसेवक संपूर्ण भारतभर कोविड-19  च्या विरोधातील  युद्धात आघाडीवर आहेत, नागरी प्रशासनांबरोबर काम करत आहेत, वृद्धांना आणि गरीबांना महामारीला सामोरे जाण्यास मदत करत आहेत आणि कोविड रुग्णांना रक्त आणि प्लाझ्मा दान करत आहेत. भारतीय स्वयंसेवकांच्या पुढाकाराचे सर्वांनी कौतुक केले आहे.

शांतता आणि विकासामध्ये आणि त्याही पलीकडे ‘स्वेच्छेने ’ सामील होण्याच्या सामायिक  उद्दिष्टांसाठी सर्व ब्रिक्स राष्ट्रांचे सामर्थ्य व पाठबळ मिळवण्याच्या गरजेविषयी बोलताना  रिजीजू म्हणाले, खरंच आपण  ब्रिक्स राष्ट्र म्हणून नव्या बांधिलकीसह  एकत्र उभे आहोत. आरोग्य शिक्षण, संस्कृती, कला, तसेच व्यापार आणि त्याही पलीकडे जागतिक आणि प्रादेशिक गरजा पूर्ण करण्यासाठी  सामायिक आव्हानं आणि त्याचबरोबर सामायिक उपाययोजनापर्यंत आपण  पोहोचायला हवे  स्वयंसेवकत्व विकसित करण्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर देखील त्यांनी भर दिला .  ते म्हणाले की, ब्रिक्स राष्ट्र म्हणून आपल्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी ते महत्वपूर्ण ठरेल.

आपले भाषण संपवताना रिजीजू म्हणाले, वेळोवेळी झालेल्या ब्रिक्स नेत्यांच्या शिखर परिषदांदरम्यान पंतप्रधानांनी व्यक्त केलेली वचनबद्धता आणि मांडलेल्या कल्पना पुढे नेण्यासाठी  भारत वचनबद्ध आहे. मी पुन्हा जागतिक शांतता आणि सौहार्दासाठी आणि मानवजातीच्या सेवेसाठी तरुणांच्या सहभागासाठी आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो.

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1677824) Visitor Counter : 357