भारतीय स्पर्धा आयोग
श्रीकालहस्ती पाईप्स या कंपनीचे इलेक्ट्रोस्टील कास्टिंग या कंपनीसोबत एकत्रीकरण आणि विलीनीकरणाला भारतीय स्पर्धा आयोगाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
01 DEC 2020 4:49PM by PIB Mumbai
एसपीएल अर्थात श्रीकालहस्ती पाईप्स मर्या. या कंपनीचे ईसीएल अर्थात इलेक्ट्रोस्टील कास्टिंग मर्या.या कंपनीसोबत एकत्रीकरण आणि विलीनीकरणाच्या प्रस्तावाला भारतीय स्पर्धा आयोगाने स्पर्धात्मक कायदा 2002 मधील विभाग 31(1) अन्वये आज मंजुरी दिली.
ईसीएल ही भारतातील भांडवल बाजारातील नोंदणीकृत कंपनी असून इलेक्ट्रोस्टील गटातील सर्व कंपन्यांची एकमेव धारक कंपनी आहे. ही कंपनी प्रामुख्याने लोखंडी पाईप्स, लोखंडी उपकरणे आणि ओतीव लोखंडी पाईप्सची निर्मिती आणि पुरवठा क्षेत्रात कार्यरत आहे.
एसपीएल ही देखील भारतातील भांडवल बाजारातील नोंदणीकृत कंपनी आहे आणि ती इलेक्ट्रोस्टील गटातील कंपन्यांपैकी एक आहे.ही कंपनी लवचिक लोखंडी पाईप्सची निर्मिती आणि पुरवठा करते.
प्रस्तावित एकत्रीकरणामुळे एसपीएल ही कंपनी ईसीएल कंपनीच्या एकत्रीकरण योजनेनुसार ईसीएल कंपनीमध्ये एकत्र आणि विलीन होणार आहे. या प्रक्रीयेनंतर एसपीएल ही कंपनी विसर्जित होऊन ईसीएल ही एकच कंपनी अस्तित्वात असणार आहे.
भारतीय स्पर्धा आयोगाचा तपशीलवार आदेश लवकरच जारी होईल.
Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1677423)
आगंतुक पटल : 153