माहिती आणि प्रसारण मंत्रालय

प्रकाश जावडेकर आणि हरदीप सिंग पुरी यांनी ‘शीखांशी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारचे विशेष संबंध’ या पुस्तकाचे केले प्रकाशन

Posted On: 30 NOV 2020 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2020

 

केंद्रीय माहिती आणि  प्रसारण मंत्री  प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि  गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री  हरदीपसिंग पुरी यांनी आज ‘शीखांशी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारचे  विशेष संबंध’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. हिंदी, पंजाबी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

Fotor_160672728577271.jpg

हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल हरदीप पुरी यांनी जावडेकर आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे अभिनंदन केले. श्री गुरु नानक देव जी यांची 550 वी जयंती साजरी करण्यासाठी वर्षभरापूर्वी घेण्यात आलेल्या विविध निर्णयांचा पुरी यांनी उल्लेख केला ज्यात  आज प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकाचाही समावेश होता.

या निर्णयाबाबत  बोलताना ते  म्हणाले की, ब्रिटन आणि कॅनडामधील विद्यापीठात गुरु नानक देव जी यांच्या शिकवणीवर आधारित अध्यासन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि कॅनडामध्ये ते स्थापित करण्यासाठी चर्चा सुरू आहे.  जे काही निर्णय घेतले गेले आहेत, ते विक्रमी वेळेत अंमलात आणले गेले आहेत असेही त्यांनी नमूद केले. अगदी छोटय़ा छोट्या व्यवस्थांकडे पंतप्रधान वैयक्तिकरित्या लक्ष देतात आणि कर्तारपूर  कॉरिडॉरसाठी पहिला जत्था रवाना करताना पंतप्रधान स्वतः उपस्थित होते असे सांगत त्यांनी याचे श्रेय पंतप्रधानांना दिले.

अन्य महत्त्वाच्या निर्णयामध्ये , लंगरांवर  कर न आकारणे  , श्री हरमंदिर साहिबला एफसीआरए नोंदणी, जागतिक संगत सहभागाला परवानगी, शीख समुदायाच्या मागणीनुसार ‘ब्लॅकलिस्ट’ मध्ये सुधारणा आदींचा त्यांनी उल्लेख केला.

शाश्वत विकास आणि महिला सक्षमीकरणाबाबत नानक देव जी  यांच्या शिकवणप्रति केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. ते  म्हणाले की, गुरु महाराजांच्या शिकवणीचा समावेश सरकारच्या कार्यक्रम पत्रिकेत करण्यात आला आहे.

यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव  अमित खरे उपस्थित होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत  बीओसी ने या पुस्तकाची निर्मिती केली असून श्री गुरु नानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त आज ते प्रकाशित  करण्यात आले.

हे पुस्तक पुढील लिंकवर पाहता येईल : https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/English.pdf

 

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1677176) Visitor Counter : 144