आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ. हर्षवर्धन यांनी जुनी दिल्ली रेल्वे स्थानकावर इंडियन रेडक्रॉस सोसायटी (आयआरसीएस) सह मास्क आणि साबणांचे केले वितरण


“कोविड विरुद्धच्या लढ्याला लवकरच अकरा महिने पूर्ण होतील आणि तेव्हापासून मास्क आणि सेनेटायझर आमचे मुख्य शस्त्र आहे”

Posted On: 30 NOV 2020 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2020

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष (आयआरसीएस) यांनी आज जुनी दिल्ली रेल्वे स्थानकात मास्क आणि साबणाचे वाटप केले.

मास्क घालणे आणि हात धुण्याच्या महत्वावर जोर देताना डॉ हर्षवर्धन म्हणाले, “कोविड विरुद्धच्या लढ्याला  लवकरच अकरा महिने पूर्ण होतील. तेव्हापासून, स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करण्यासाठी स्वच्छता आणि सामाजिक अंतरांच्या मूलभूत तत्त्वांचे अनुसरण केले. कोविड विरूद्ध लढा देताना मास्क आणि सेनेटायझर आमचे मुख्य शस्त्र आहे.”

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रत्येकाने मास्क घातला आहे हे पाहून सगळ्यांचे कौतुक करताना डॉ हर्षवर्धन म्हणाले, “या मास्क आणि साबण वितरणामागे एक मोठा संदेश आहे. हा संदेश पोहोचविणे हे उद्दिष्ट आहे. सरकार वेगवेगळ्या वाहिन्या व उपक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे. या अंमलबजावणीमध्ये हमाल, टॅक्सी संघटना, तीन चाकी वाहन संघटना यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. ”

WhatsApp Image 2020-11-30 at 1.07.55 PM.jpeg

भारतातील कोविड परिस्थितीबद्दल बोलताना डॉ. हर्षवर्धन यांनी कोविड पॅरामीटर्समधील प्रगतीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “संपूर्ण जगात रुग्ण बरे होण्याचा सर्वाधिक दर भारतामध्ये आहे. जानेवारी 2020 मध्ये आमच्यकडे फक्त एकच प्रयोगशाळा होती परंतु आता आमच्याकडे 2165 प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत. दररोज दहा लाखाहून अधिक लोकांची चाचणी केली जाते. आम्ही आज 14 कोटी इतक्या एकत्रित चाचण्या पूर्ण केल्या आहेत. या सगळ्यातून, साथीच्या आजराविरुद्धच्या लढ्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे अथक प्रयत्न आणि सरकारचा दृढनिश्चय दिसून येतो.”

ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली भारत मास्क, पीपीई किट्स, व्हेंटिलेटर इत्यादींच्या उत्पादनांमध्ये स्वावलंबी झाला आहे. भारतात दररोज 10 लाखाहून अधिक पीपीई किट तयार होत आहेत आणि आता या लसीच्या संशोधनात आमचे वैज्ञानिक मोलाची भूमिका बजावत असून ती वेळेवर उपलब्ध होईल.”

डॉ. हर्षवर्धन यांनी लोकांना 6 फुटाच्या अंतराच्या नियमाचे पालन करण्याची विनंती केली. ते म्हणाले, “आपल्याकडून झालेलं छोटेसे दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणामुळे मोठ्या समस्या उद्भवू शकतात. संपूर्ण जगात कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूचे सर्वात कमी प्रमाण जरी भारतात असले तरीदेखील, या आजारामुळे एखाद्या व्यक्तीचा झालेला मृत्यू हे त्याचे मित्र आणि कुटुंबाचे हे सर्वात मोठे नुकसान आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहचवावा असे आपणा सर्वांना माझे भावनिक आवाहन आहे. ”

WhatsApp Image 2020-11-30 at 1.07.57 PM.jpeg

या कार्यक्रमाला आर.के. जैन, सरचिटणीस, आयआरसीएस,  एस. सी. जैन, डीआरएम, दिल्ली उपस्थित होते.
 

* * *

S.Tupe/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1677155) Visitor Counter : 149