आदिवासी विकास मंत्रालय
आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या TRIFED ची गोवा राज्यासाठी ‘गोट्रायबल योजना’
राज्यभरात 25 वनधन विकास केंद्रे, 25 खरेदी केंद्रे वा गोदामे, 2 स्थानिक प्रक्रिया केंद्रे तसेच प्रमुख घाउक विक्री केंद्रे प्रस्तावित
Posted On:
27 NOV 2020 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2020
आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीतील TRIFED ने 26 नोव्हेंबर रोजी गोवा आदिवासी विकास योजनेला अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीने गोवा प्रशासनाबरोबर दूरस्थ पद्धतीने एक बैठक आयोजित केली होती. या दूरस्थ बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोव्याचे मुख्य सचिव परिमल राय होते. आदिवासी विभागाचे मुख्य सचिव रेड्डी, PCCF सुभाष चंद्रा, TRIFED चे व्यवस्थापकिय संचालक प्रवीर कृष्णा व TRIFED चे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. 25 वनधन विकास केंद्रांची स्थापना, आदिवासी फूड पार्क, आणि उत्तर व दक्षिण गोव्यात दोन शोरूम यासह गोवा राज्यासाठी आदिवासी विकास योजनेला अंतिम स्वरूप देणे हे या बैठकीचे उद्दिष्ट होते.
यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रवीर कृष्णा यांच्यामध्ये चर्चा झाली. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी गोवा आदिवासी योजना राबवण्यास संमती दिली. पर्यायाने गोवा राज्याच्या मुख्य सचिवांनी 50 कोटींच्या आदिवासी विकास योजनेच्या कार्यपद्धतीविषयी चर्चा केली. विकास योजनेतील प्रस्तावित कार्यांमध्ये गोव्यात 25 वनधन विकास केंद्रांची (VDVK) स्थापना, 25 खरेदी केंद्रे वा गोदामे, दोन स्थानिक प्रक्रिया केंद्रे ( मेगा फूड पार्क/ आदिवासी उपक्रम) तसेच राज्यात प्रमुख घाउक विक्री केंद्रे प्रस्तावित आहेत. एका वनधन विकास केंद्रांत किमान 20 छोट्या मोठ्या वन उपजांची ओळख करून देण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनाबद्ध उपक्रमानुसार TRIFED चा हा सर्वसमावेशक आणि सर्वांगिण कार्यक्रम आदिवासींमध्ये रोजगार, उत्पन्न आणि व्यवसायाला चालना देणारा आहे. TRIFED ही आदिवासी व्यावसाय मॉडेल्सच्या माध्यमातून देशभरातील आदिवासी परिसंस्थांचे संपूर्ण परिवर्तन करण्याचे काम करते.
* * *
G.Chippalkatti/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1676535)
Visitor Counter : 166