संरक्षण मंत्रालय
ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त बॅरी ओ ’फॅरेल एओ यांनी फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ वेस्टर्न नेव्हल कमांड यांची भेट घेतली
Posted On:
24 NOV 2020 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2020
ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त बॅरी ओ ’फॅरेल एओ यांनी फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ वेस्टर्न नेव्हल कमांड अजित कुमार यांची 23 नोव्हेंबर रोजी भेट घेतली. सुश्री सारा रॉबर्ट्स, कौन्सिल जनरल, ऑस्ट्रेलियाचे वाणिज्य दूतावास, मुंबई आणि तीन सदस्य प्रतिनिधी यावेळी त्यांच्यासोबत होते. उच्चायुक्तांनी संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील द्विपक्षीय सहयोग, धोरणात्मक भागीदारी आदी विविध मुद्द्यांवर विचारांचे आदानप्रदान केले. पश्चिम नौदल कमांड येथील एअरक्राफ्ट कॅरियर डॉकलाही उच्चायुक्तांनी भेट दिली.
नुकत्याच पार पडलेल्या क्वाड अभ्यास मलाबर 2020 मुळे उच्चायुक्तांची ही भेट महत्त्वपूर्ण होती ज्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेने भाग घेतला होता. एच.एम.ए.एस. बल्लारट या रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीच्या फ्रिगेटने मलाबार 20 च्या दोन्ही टप्प्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते आणि 10 ते 13 नोव्हेंबर 2020 या कालावधीत गोवा बंदरात काही काळासाठी काम केले होते.
उच्चायुक्तांची सध्याची भेट दोन्ही राष्ट्रकुल देशांमधील चांगल्या संबंधांच्या अनुषंगाने असून दोन्ही नौदलामधील सध्याचे बंध आणखी मजबूत करण्याची अपेक्षा आहे.
* * *
M.Iyengar/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1675320)
Visitor Counter : 176