राष्ट्रपती कार्यालय

गुरू तेग बहादूर यांच्या ‘हौतात्म्य दिनाच्या’ पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा संदेश

Posted On: 23 NOV 2020 6:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  23 नोव्हेंबर 2020

राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांनी गुरु तेग बहादूर यांच्या ‘हौतात्म्य दिनाच्या’ पूर्वसंध्येला दिलेला संदेश खालीलप्रमाणे : -

गुरु तेग बहादुर जी यांच्या हौतात्म्य दिनाच्या पवित्र दिना निमित्त मी त्यांना नम्र श्रद्धांजली अर्पण करतो.

शीख समुदायाचे नववे गुरु श्री तेग बहादुर जी यांनी लोकांची श्रद्धा, विश्वास आणि हक्कांच्या रक्षणासाठी सर्वोच्च त्याग केला आहे. म्हणूनच, देशवासी त्यांना  प्रेमाने आणि आदराने हिंद दि चादर म्हणून संबोधतात. त्यांच्या बलिदानाने आपल्या सर्वांना मानवतेची खऱ्या अर्थाने सेवा करण्यासाठी  एकत्र येण्याची प्रेरणा दिली आहे. गुरु तेग बहादुर यांचे उपदेश आणि त्यांचे कार्य आपल्या सर्वांमध्ये प्रेम आणि देशप्रेमाची भावना निरंतर जोपासून ठेवत आहे.

या पवित्र दिनी , आपण संकल्प करूया की आपल्या विचारांमधून हिंसा, संकुचितपणा आणि द्वेष दूर करून आपण इतरांच्या निःस्वार्थ सेवेसाठी स्वतःला समर्पित करू आणि प्रेम, सौहार्द आणि करुणा यासारख्या मानवी मूल्यांना प्रोत्साहन देऊ.

राष्ट्रपतींचा संदेश वाचण्यासाठी इथे क्लिक करा

M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1675119) Visitor Counter : 116