संरक्षण मंत्रालय
अंदमान समुद्रात एसआयटीएमईएक्स-20 त्रिपक्षीय सागरी कवायती
Posted On:
22 NOV 2020 1:21PM by PIB Mumbai
स्वदेशी बनावटीची एएसडब्ल्यू कॉर्वेट कामोर्ता आणि कॉर्वेट करमुक क्षेपणास्त्र यांच्यासह भारतीय नौदलाची जहाजे अंदमान समुद्रात 21 ते 22 नोव्हेंबर 20 या कालावधीत होत असलेल्या एसआयटीएमईएक्स -20 या भारत, सिंगापूर आणि थायलंड त्रिपक्षीय सागरी कवायतीत भाग घेत आहेत.
भारतीय नौदलाने यजमानपद भूषवलेली पहिली एसआयटीएमईएक्स कवायत सप्टेंबर 2019 मध्ये पोर्ट ब्लेअर जवळ आयोजित करण्यात आली होती. भारतीय नौदल , सिंगापुर नौदल आणि थाई नौदल यांच्यात परस्पर आंतर-परिचालन क्षमता वाढवण्यासाठी आणि सर्वोत्तम पद्धती स्वीकारण्यासाठी एसआयटीएमईएक्स कवायतीचे आयोजन केले जाते. 2020 ची ही कवायत सिंगापूर नौदल आयोजित करत आहे.
कोविड 19 महामारी लक्षात घेऊन ही कवायत ‘विना स्पर्श , केवळ समुद्रात ’ होत असून तीन मैत्रीपूर्ण नौदले आणि सागरी शेजार्यांमधील समुद्री क्षेत्रात वाढता समन्वय आणि सहकार्य अधोरेखित करते. दोन दिवसांच्या या सागरी कवायतीत तिन्ही नौदले नौदलातील डावपेच , पृष्ठभागावरील युद्ध सराव आणि शस्त्रास्त्र गोळीबारासह विविध सरावांमध्ये सहभागी होतील.
M.Chopade/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1674856)
Visitor Counter : 234