कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्यावतीने कोविड-19चा प्रसार रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन

Posted On: 21 NOV 2020 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2020

 

उत्तराखंडमधील मसुरी इथल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीमध्ये 57 प्रशिक्षणार्थी अधिका-यांना कोविडची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. 95व्या फौंडेशन अभ्यासक्रमासाठी भारतीय प्रशासकीय सेवेसाठी निवड करण्यात आलेले एकूण 428 उमेदवार, या अकादमी परिसरामध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून आले आहेत.

या अकादमीमध्ये गृह मंत्रालय आणि देहराडून जिल्हा प्रशासन यांनी दिलेल्या दिशा-निर्देशांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. कोविड-19 प्रसार रोखण्यासाठी अकादमीमध्ये आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत. कोविडची बाधा झालेल्या प्रशिक्षणार्थींचे विशेष कोविड दक्षता केंद्रामध्ये विलगीकरण केले आहे. दि. 20 नोव्हेंबर, 2020 पासून अकादमीने जिल्हाधिकारींच्या समन्वयाने 162 पेक्षा जास्त आरटी-पीसीआर चाचण्या केल्या आहेत.

या प्रशिक्षणातल्या सर्व उपक्रमांचे आता दि. 3 डिसेंबर, 2020च्या रात्रीपर्यंत ऑनलाइन आयोजन करण्याचा निर्णय अकादमीने घेतला आहे. प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि अकादमीचे कर्मचारी कोविडसंबंधीच्या शिष्टाचाराचे पालन करीत आहेत. यामध्ये सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे आणि मास्क वापरणे यांचे सक्तीने पालन करण्यात येत आहे.

प्रशिक्षणार्थींच्या सुरक्षेचा विचार करून सर्व सुरक्षा साधनांचा वापर करून अकादमीचे कर्मचारी, प्रशिक्षणार्थींच्या वसतिगृहामध्येच त्यांना भोजन आणि इतर आवश्यक गोष्टी पुरवत आहेत.


* * *

Jaydevi PS/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1674813) Visitor Counter : 181