सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सुधारीत संकेतस्थळ कार्यरत
Posted On:
18 NOV 2020 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2020
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ), सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने आपले संकेतस्थळ 18 नोव्हेंबरपासून अद्ययावत केले आहे. सुधारीत संकेतस्थळ mospi.gov.in. असे आहे.
पोर्टल विकास तंत्रज्ञानाचा वापर करून वापरकर्त्यांना एकात्मिक डिजिटल अनुभव प्रदान करण्याच्या उद्देशाने नवीन संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. डीएआरपीजी आणि एनआयसीच्या जीआयजीडब्ल्यु नियमावलीनुसार सुधारीत संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. एमओएसपीआयच्या संकेतस्थळावर महत्त्वाच्या शासकीय योजनांविषयी केंद्रीय बॅनर प्रकाशन योजना (सीबीपीएस) सुनिश्चित करण्यासंदर्भातील अनुपालन सुनिश्चित करण्यात आले आहे.
संकेतस्थळाचे डिझाइन गोंधळमुक्त आणि वापरकर्त्यांना सुलभ आहे. मोबाईल उपकरणावर हाताळण्यास सुलभ आणि दिव्यांगस्नेही संकेतस्थळ आहे. एमओएसपीआय अधिकाऱ्यांचा संपर्क तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
अभ्यागत आपल्या अनुभवाची माहिती देऊ शकतात, “लोकसहभागाला” चालना देऊन, संकेतस्थळावर उपलब्ध शेअर बटणाद्वारे फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन या समाजमाध्यमांवर दुवा सामायिक करू शकता.
प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, जुन्या संकेतस्थळाचा दुवा नवीन संकेतस्थळावरर 6 महिन्यांसाठी उपलब्ध असेल : mospi.nic.in
सूचना: -
- सदर प्रसिद्धीपत्रक मंत्रालयाच्या - http://www.mospi.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- हिंदी प्रसिद्धीपत्रक: http://mospi.gov.in/hi या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
* * *
Jaydevi PS/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1673842)
Visitor Counter : 134