नौवहन मंत्रालय

केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी मंत्रालयाच्या नवीन नामकरण फलकाचे केले अनावरण


नौवहन मंत्रालयाचे बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय असे नामकरण करण्यात आले

बदललेल्या नावासह मंत्रालय जलमार्गाच्या आणि किनारपट्टी नौवहनाच्या विकासावर अधिक भर देणार : मनसुख मांडवीय

Posted On: 12 NOV 2020 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 नोव्‍हेंबर 2020


केंद्रीय बंदर, नौवहन आणि  जलमार्ग आणि रसायने व खते राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार ) यांनी आज नवी दिल्ली येथे मंत्रालयाच्या नवीन नामकरण फलकाचे  अनावरण केले आणि मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह  बंदरे आणि सार्वजनिक उपक्रमातील सर्व अधिकाऱ्यांना संबोधित केले.

नौवहन मंत्रालयाचे नाव बदलून बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय असे नामकरण करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2020 रोजी गुजरातमधील हजिरा आणि घोघा दरम्यान रो-पॅक्स फेरी सेवेच्या   व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन समारंभाला संबोधित करताना नौवहन मंत्रालयाचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. .

ही ऐतिहासिक घोषणा करतांना  मोदी म्हणाले, “आता हे मंत्रालय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय म्हणून ओळखले जाईल. त्याचा विस्तार केला जात आहे. बर्‍याच विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये, नौवहन मंत्रालयाकडे बंदरे आणि जलमार्गाचीही  जबाबदारी  असते. भारतात, नौवहन मंत्रालय बंदरे आणि जलमार्गाशी संबंधित बरीच कामे करत आहे. आता नावात  अधिक स्पष्टता आल्यामुळे कामातही अधिक स्पष्टता येईल. ”

पंतप्रधानांनी नाव बदलण्याची घोषणा करताच मंत्रालयाने संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण करण्याबाबत कार्यवाही केली. सर्व औपचारिकता दोन कामकाजाच्या दिवसात पूर्ण झाल्या आणि 10 नोव्हेंबर 2020 रोजी नाव बदलल्याची अधिकृत अधिसूचना भारतीय राजपत्रात प्रसिद्ध झाली.

आज फलक सोहळ्याच्या औपचारिक अनावरण दरम्यान . मनसुख मांडवीय म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीसह देश मल्टिमोडल संपर्क व्यवस्थेच्या समग्र आणि दीर्घकालीन दृष्टिकोनासह पुढे जात आहे ही खरोखरच अभिमानाची बाब आहे. बंदरे, नौवहन आणि जलवाहतुकीचा विचार करता कामाच्या व्याप्तीच्या विस्तारासंबंधी त्यांच्या   दूरदृष्टीबद्दल आपण पंतप्रधानांचे खरोखर कृतज्ञ आहोत , असेही ते म्हणाले.

मनसुख मांडवीय  म्हणाले की, “बदललेल्या नावामुळे मंत्रालय जलमार्ग आणि किनारपट्टी नौवहनावर  अधिक भर देईल. आतापर्यन्त सुमारे  1400 कि.मी. जलमार्ग पूर्णपणे विकसित झाला आहे आणि प्राधान्यक्रमानुसार अतिरिक्त 1000 कि.मी. विकसित केला जात आहे. ज्यासाठी डीपीआर / व्यवहार्यता अभ्यास पूर्ण झाला आहे. आम्ही पोर्ट ग्रिड तयार करण्यावर भर देत आहोत, ज्यात मच्छीमारी बंदर, कृषी बंदर आणि खनिज बंदर इत्यादींसह अनेक लहान बंदरांचा समावेश असेल जेणेकरून देशात बंदर विकास व बंदर प्रणित विकास शक्य होईल. ”

बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव संजीव रंजन,अतिरिक्त सचिव  संजय बंडोपाध्याय,, आयडब्ल्यूएआयच्या अध्यक्ष  डॉ. अमिता प्रसाद, नौवहन महासंचालक अमिताभ कुमार, आयपीएचे अध्यक्ष टी. के.  रामचंद्रन यांच्यासह सर्व प्रमुख बंदरांचे अध्यक्ष आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमास उपस्थित होते.
 

* * *

G.Chippalkatti/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1672343) Visitor Counter : 263