नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

इरेडाची 33 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक


2019-20 आर्थिक वर्षात स्थूल उत्पन्न 17 टक्के वाढून 2372 कोटी रुपये

इरेडाकडून 12,696 कोटींची कर्जप्रकरणे मंजूर, 8,785 कोटी रुपये कर्जांचे वितरण, 2019-20 मध्ये अतिरिक्त 5673 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांना पाठबळ

Posted On: 12 NOV 2020 3:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 नोव्‍हेंबर 2020

 

नवीन आणि नवीकरणीय  ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारितील  भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास एजन्सी (आयआरईडा-इरेडा) ची वार्षिक बैठक नवी दिल्लीतल्या भारत आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये काल झाली. वर्ष 2019-20 या आर्थिक वर्षातल्या व्यवहारांना या सर्वसाधारण बैठकीत मान्यता देण्यात आली. 

या बैठकीत उपस्थित असलेल्या भागीदारांना इरेडाचे मुख्य कार्यकारी संचालक प्रदीप कुमार दास यांनी इरेडाने 2019-20 या आर्थिक वर्षात केलेल्या कामगिरीची माहिती दिली. कंपनीच्या उत्पन्नामध्ये 17.32 टक्के वाढ नोंदली गेली आहे. आता कंपनीचे उत्पादन 2,372.38 कोटी रुपये झाले आहे. इरेडाने या वर्षामध्ये 12,696 कोटींची कर्ज प्रकरणे मंजूर केली आणि 8,785 कोटी रुपयांची कर्जे वितरित केली आहेत. त्याचबरोबर सह-वित्तपुरवठा प्रकल्पांसह कर्ज मंजुरी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त 2019-20 या आर्थिक वर्षात 5673 मेगावॅट क्षमता वृद्धी झाली आहे. गेल्यावर्षी 3266 मेगावॅट क्षमता वाढ नोंदवली गेली होती. 

आगामी काळामध्ये इरेडाच्या धोरणाविषयी बोलताना प्रदीप कुमार दास म्हणाले की हरित ऊर्जा क्षेत्रामध्ये गुणात्मक आणि दर्जात्मक कार्य करण्यावर सातत्याने भर देण्यात येणार आहे. सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांना प्राधान्य देणे त्याचबरोबर प्रधानमंत्री कुसुम योजना, सौर आणि पवन अशा संयुक्त ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देणे, जैवइंधन, इथेनॉल आणि कम्प्रेस्ड बायो गॅस (सीबीजी), ई-मोबिलीटी आणि त्यासंबंधित पायाभूत सुविधा, सौर छत कार्यक्रम यांना चालना देण्यात येणार आहे. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रामध्ये साधन सामुग्रीच्या गरजा पूर्ण करण्यासाइी इरेडा आंतरराष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय स्तरावर नवीन कार्यपद्धती स्वीकारत आहे. त्याचबरोबर इरेडा इतर स्त्रोतांमधून निधी जमा करण्यासाठी पर्यायी आर्थिक साधने निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही दास यांनी यावेळी सांगितले. 

 

* * *

G.Chippalkatti/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1672258) Visitor Counter : 132