श्रम आणि रोजगार मंत्रालय
कोविड महामारी कालखंडात उत्कृष्ट काम केल्याबद्दल सीएलसी, ईपीएफओ आणि ईएसआयसी प्रादेशिक कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांचा गंगवार यांच्या हस्ते सत्कार
Posted On:
11 NOV 2020 6:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2020
मुख्य कामगार आयुक्त कार्यालय, कर्मचारी भविष्य निधी कार्यालय आणि कामगार राज्य विमा महामंडळ या कार्यालयाच्या कोविडयोध्यांनी कोविड-19 महामारीमध्ये घेतलेले परिश्रम आणि कामातील सातत्य यांची दखल घेत कामगार आणि रोजगार मंत्रालयाने आज एका सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.
या आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांनी तसेच प्रादेशिक कार्यालयांनी कामाप्रती दाखवलेली निष्ठा आणि कामातील उत्कृष्टता याचा गौरव करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष गंगवार यांनी गुणवत्ता-गौरव प्रमाणपत्र प्रदान केली. कामगारांचे कल्याण आणि उद्योग यांच्या हितासाठी मंत्रालयाने ऐतिहासिक पावले उचलली असल्याचे गंगवार म्हणाले.
2 कोटी बांधकाम कामगारांसाठी 5 कोटी रुपये बँकेत गुंतवले असल्याची माहिती गंगवार यांनी दिली. हे काम सुरळीतपणे पार पडावे यासाठी मुख्य कामगार आयुक्तांनी 80 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालय आणि कामगार राज्य विमा महामंडळ यांचे नोडल अधिकारी त्यांच्या प्रादेशिक कार्यलयांसह कामगारांना तोंड दयाव्या लागणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत असे ते म्हणाले.
20 नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून 16 हजार तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी 96 टक्के ठराविक मुदतीच्या आत मुख्य कामगार आयुक्त कार्यालय, कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालय आणि कामगार राज्य विमा महामंडळ यांच्याकडून तडीस नेण्यात आल्या. समर्पित वृत्तीने एकत्रित काम केल्याबद्दल या तिन्ही आस्थापनांमधील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि प्रादेशिक कार्यालयांचे त्यांनी आभार मानले. 23 कामगार राज्य विमा महामंडळ (ESIC)ची रुग्णालये ही आता कोविड-19 विशेष रुग्णालये म्हणून घोषित झाली असून त्यात 2600 अलगीकरण खाटा, 555 आयसीयु खाटा, 213 पेक्षा जास्त व्हेंटीलेटर्स या सुविधा आहेत. कोविड महामारीदरम्यान सभासदांपैकी 47 लाख कोविडसंबंधी दावे तसेच विशेष कोविड दावे प्रकरणात 12,000 कोटी रुपये देण्यासाठी कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने केलेल्या कामाचा मंत्र्यांनी विशेष उल्लेख केला.
पुरस्कार विजेत्यांच्या यादीसाठी इथे क्लिक करा.
S.Thakur/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1671992)
Visitor Counter : 171