विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

30 मीटर दुर्बिण प्रकल्पावर (TMT)  भारतीय खगोल तज्ञांचे नोबेल विजेत्यांसह काम

30 मीटर दुर्बिण प्रकल्प (TMT) हा आंतरराष्ट्रीय सहयोगाने कॅलिफोर्नियामधील कॅल्टेक विद्यापीठे, कॅनडा, जपान, चीन आणि भारत यांच्या सहयोगाने साकारत आलेला प्रकल्प

Posted On: 10 NOV 2020 9:00PM by PIB Mumbai

 

2020 चे भौतिकशास्त्राचे नोबेल विजेते प्रोफेसर एन्ड्रीया घेझ यांनी विश्वातील घडामोडी आणि त्यांचा कार्यकारणभाव समजून घेण्यासाठी हवाईतील मौनेकिया येथे उभारलेल्या थर्टी मीटर टेलिस्कोप प्रकल्पाच्या(TMT)  बॅक एण्डला असणारी उपकरणे तसेच या प्रकल्पाशी संबधित वैज्ञानिक शक्यता यावर भारतीय खगोलतज्ञांसोबत  काम केले आहे.

याशिवाय  प्रोसेसर रॉजर पेनरोज व प्रोफेसर राईनहर्ड गेन्झेल यांनी  आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या प्रचंड वस्तुमानाच्या शोध घेतला त्यातही डॉक्टर घेझ यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. यासाठी त्यांना भौतिकशास्त्राचे नोबेल विभागून मिळाले आहे. TMT ,संबधित  उपकरणे आणि TMT चे अनेक शक्यता असलेले वैज्ञानिक पैलूनेक्स्ट जनरेशन वेधशाळा या कामात त्या पूर्ण गुंतलेल्या आहेत.   उपयुक्त विज्ञान प्रकल्प आणि TMTशी संबधित संशोधनाचे अत्याधुनिक आणि दैनंदिन वापरासाठी उपयुक्त अश्या अनेक अडप्टर ऑप्टिक्ससारख्या संशोधन प्रकल्पातही त्यांनी योगदान दिले आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0021XGO.jpg

तीस मीटर दुर्बिण (TMT) प्रकल्प आंतरराष्ट्रीय सहयोगाने कँलटेक ही कॅलिफोर्निया संलग्न विद्यापीठेकॅनडा, जपान, चीन आणि भारत यांच्या सहकार्याने सरकारला जाणारा प्रकल्प आहे भारताचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, अणुऊर्जा विभाग यांच्यातर्फे भारत या प्रकल्पात सहयोग देत आहे.  याशिवाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सच्या डॉक्टर अन्नपूर्णी सुब्रमण्यम या तसेच आर्यभट्ट संशोधन व अवलोकन विज्ञान संशोधन संस्था येथील डॉक्टर शशिभूषण पांडे यासह अनेक शास्त्रज्ञ  प्रोफेसर घेझ यांना TMT प्रकल्पाचे प्रगतीपथावर असलेले संशोधन आणि सुधारणेसाठी सुरू असलेल्या कामात सहकार्य देत आहेत.

यामुळे इतरांना उपयुक्त असे दोन नोंद घेण्यासारख्या संशोधन पत्रिका तयार झाल्या. 30मीटर दुर्बिणीसाठी प्रथमच वापरले जाणारे इन्फ्रारेड इमेजिंग स्पेक्टोग्राफ (IRIS) हे  उपकरण, त्याचे वैज्ञानिक पैलु आणि त्याची नक्कलप्रत हे एका 2016 मधील SPIE कार्यवाहीत स्पष्ट केले गेले. आकाशगंगेचे केंद्र, उर्जाभारित सुक्ष्म पदार्थ, आकाशगंगेचे कार्यरत केंद्र, आणि गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेनिहाय लांबवरच्या आकाशगंगा यांचा वेध घेणारा, सूर्यमालेतील घटकांचा वेध घेणारा अत्याधुनिक डेटा स्टिम्युलेटर वापरण्यात आला. यामुळे IRIS/TMT प्रकल्पाचे पुढील संशोधन  आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानचा अधिक वस्तुमान असलेला पदार्थ, विश्वाचे कार्यक्षम केंद्रक, आणि कित्येक अज्ञातातील अज्ञान उजेडात आणू शकेल. या डेटा व्यवस्थापन प्रणालीची उपयुक्तता आणि डेटा रिडक्शन हेसुद्धा प्रगतीपथावर आहे.

अंतराळविज्ञान आणि अंतराळभौतिकीशी संबधित संशोधन पत्रिकेत 2015 ला नमूद केल्याप्रमाणे भविष्यातील अनेकार्थाने उपयुक्त अंतराळविज्ञानाशी संबधित प्रकल्पात तसेच  आकाशगंगेतील अनेक खगोलीय वस्तू वा इतर द्रव्य यांचे कोडे   TMT च्या सहाय्याने उलगडण्याच्या प्रकल्पात सहभागी पथकातील अनेक भारतीय शास्त्रज्ञांना घेझ यांच्यासोबत काम करता येईल.

300 मीटर दुर्बिण (TMT) ही विज्ञानविषयक ज्ञानाचा  वेध घेत असतानाच यात सहभागी देश आणि त्यांचे नागरीक यांच्यामधीन दुवा ठरत आहे आणि यामध्ये अधिकाधिक भारतीय शास्त्रज्ञांना सहयोग देता येईल. अनेक भारतीय खगोलतज्ञांना एन्ड्रीया घेझ यांच्यासोबच कामाची संधी मिळेल. यामुळे भौतिका तसेच अंतराळ विश्वातील अनेक प्रश्नांना उत्तरे मिळतील.

[For more details, Dr. Shashi Bhushan Pandey (shashi@aries.res.in ), Mob: 9557470888 can be contacted.]

*****

M.Iyengar/V.Sahajrao /P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1671811) Visitor Counter : 50