विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

इन्स्पायर फेलोशिप प्रकरणाबाबत डीएसटीचे निवेदन

Posted On: 10 NOV 2020 5:20PM by PIB Mumbai

 

लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमन, नवी दिल्लीची विद्यार्थिनी आणि डीएसटीच्या इनस्पायर योजनेअंतर्गत उच्च शिक्षण शिष्यवृत्तीची इच्छुक जी. ऐश्वर्या रेड्डी हिच्या निधनाबद्दल विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने शोक व्यक्त केला आहे. ती देशातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांपैकी एक होती. आपल्या प्रतिभेमुळेच तिची निवड SHE शिष्यवृत्तीसाठी झाली. दर वर्षांप्रमाणे या वेळीही ऑगस्टमध्ये पात्र 9762 अर्जदारांना शिष्यवृत्तीचे प्रारंभिक फेलोशिप पत्र पाठवले गेले. विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्ष शिष्यवृत्ती देण्यासाठी शैक्षणिक संस्थांकडून बँक खाते विवरण, गुणपत्रक आणि कामगिरी प्रमाणपत्र असे तीन सामान्य कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले होते. दुर्दैवाने ही कागदपत्र ऐश्वर्या कडून मिळाली नाहीत.

निवडलेल्या सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर औपचारिकता पूर्ण करण्याचे आवाहन डीएसटीने केले आहे, जेणेकरून लवकरात लवकर शिष्यवृत्तीचे वितरण करता येईल. या बाबतीत सर्व संस्थांनी देखील सहकार्य करावे असे आवाहनही विभागाने केले आहे.

 

S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1671731) Visitor Counter : 232