निती आयोग
अटल इनोव्हेशन मिशन आणि सिरिअस( रशिया) कडून एआयएम- सिरिअस नवनिर्मिती कार्यक्रम-3.0 ची सुरुवात
शालेय विद्यार्थ्यांसाठी भारत- रशिया द्विपक्षीय युवा नवनिर्मिती कार्यक्रम
भारतीय आणि रशियन तरुणांमध्ये नवनिर्मिती सहकार्याला चालना देणार
Posted On:
07 NOV 2020 10:00PM by PIB Mumbai
अटल इनोवेशन मिशन( एआयएम) आणि रशियामधील सिरिअस या विज्ञान प्रशिक्षण केंद्राने आज भारत आणि रशियामधील शालेय विद्यार्थ्यांसाठी एआयएम- सिरिअस नवनिर्मिती कार्यक्रम 3.0 या 14 दिवसांच्या व्हर्चुअल कार्यक्रमाची सुरुवात केली. दोन्ही देशांमधील विद्यार्थ्यांनी वेब आणि मोबाईल आधारित अशा दोन्ही प्रकारच्या तंत्रज्ञानाचा आणि उपायांचा विकास करावा हा या पहिल्या भारत- रशिया युवा नवनिर्मिती उपक्रमाचा उद्देश आहे.
7 ते 21 नोव्हेंबर 2020 या दोन आठवड्यांच्या कालावधीत चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये 48 विद्यार्थी आणि 16 शिक्षक आणि मार्गदर्शकांचा समावेश असून कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, संस्कृती, दूरशिक्षण, उपयोजित आकलन विज्ञान, आरोग्य आणि कल्याण, क्रीडा, तंदुरुस्ती आणि क्रीडा प्रशिक्षण, रसायनशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल आर्थिक मालमत्ता अशा विविध क्षेत्रांमधील जागतिक आव्हानांवर उपाय ठरू शकतील, अशा प्रकारची 8 व्हर्चुअल उत्पादने आणि मोबाईल अॅप्लिकेशन्स ते तयार करणार आहेत. या वर्षीच्या कार्यक्रमामुळे विज्ञान, तंत्रज्ञान आणि संरचना प्रकल्पांमध्ये सहकार्याला आणि नवनिर्मितीला चालना मिळेल, हे सांगताना मला अतिशय अभिमान वाटत आहे, असे एआयएम मिशनचे संचालक आर. रामन यांनी सांगितले. भारत आणि रशिया यांच्यातील हा पहिला द्विपक्षीय विद्यार्थी सहकार्य उपक्रम आहे आणि अटल टिंकरिंग लॅब आणि सिरिअस केंद्राचा चमू या दोघांकडूनही त्याबाबत खूप जास्त स्वारस्य दाखवले जात आहे, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या चमूकडून अॅप डेव्हलपमेंट, कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, मशीन लर्निंग, डेटा अॅनालिटिक्स अँड विजुअलायजेशन, यूआय/ यूएक्स, व्हर्चुअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, गेमिफिकेशन, थ्री डी डिझाईन आणि रॅपिड प्रोटोटायपिंग यांसारख्या विविध प्रकारच्या विकसित होणाऱ्या नव्या तंत्रज्ञान उपायांमुळे 21व्या शतकातील तंत्रज्ञानाला आणखी पाठबळ मिळणार आहे. या उद्योगातील आणि शैक्षणिक संस्थांमधील एआयएम आणि सिरिअस केंद्राचे मार्गदर्शक या चमूंना अतिशय बारकाईने मार्गदर्शन करतील.
आंतरराष्ट्रीय सहकार्याविना आधुनिक विज्ञानाची कल्पना करता येणार नाही. नेहमीच विविध भाषा बोलणाऱ्या शास्त्रज्ञांकडून शोध लावले जातात पण ते एका ध्येयाने एकजूट होतात. सिरिअस आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाकडून अशा संधी निर्माण करण्यासाठी साहाय्य करण्यात येईल. आपण गुणवत्ता असलेल्या बालकांना, युवा वैज्ञानिकांना आणि अभियंत्यांना प्रशिक्षण देतो आणि ते नेहमीच विज्ञान आणि समाजातील सर्वात मोठ्या आव्हानांवर तोडगे काढतात, असे रशियामधील विज्ञान आणि शिक्षण अध्यक्षीय परिषदेच्या सदस्य आणि टॅलेंट अँड सक्सेस फाउंडेशनच्या प्रमुख एलेना श्मेलेवा यांनी सांगितले. यावेळी होणाऱ्या या उपक्रमामध्ये रशियामधील सिरिअस केंद्राच्या सर्वोत्तम विद्यार्थ्यांचा आणि 2019च्या अटल टिंकरिंग लॅब मॅरॅथॉनमधील 150 संघामधील एटीएल प्रमुखांचा आणि भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी 25 विद्यार्थी आणि 5 शिक्षकांच्या भारतीय शिष्टमंडळाने रशियामधील सिरिअस केंद्राला सात दिवसांच्या संशोधन आधारित कार्यक्रमासाठी भेट दिली होती. या चमूने रिमोट अर्थ सेन्सिंग, बायोलॉजिकल आणि जेनेटिक संशोधन, स्वच्छ उर्जा, डेटा ऍनालिटिक्स आणि ड्रोन, रोबोटिक्स आघाडीच्या तंत्रज्ञानाशी संबंधित विविध प्रकारचे 8 नवनिर्मिती प्रकल्प तयार केले होते. या प्रकल्पांचे ऱशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासमोर 5 डिसेंबर 2019 रोजी सादरीकरण करण्यात आले होते.
***
S.Thakur/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1671125)