कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे नवीन कौशल्य विस्तारित करण्यासाठी राज्यांना पत्र


6 महिन्यांपासून दोन वर्षांच्या कालावधीतील 13 नवीन अभ्यासक्रमांची घोषणा

Posted On: 06 NOV 2020 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 नोव्‍हेंबर 2020


युवा वर्गामध्ये नव्या युगातील कौशल्य विकसित करण्याचा उद्देशाने कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने (एमएसडीई) राज्यांना आपल्या संबंधित प्रशिक्षण केंद्रांमध्ये नवीन कौशल्य अभ्यासक्रमांचा विस्तार करण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील कुशल कामगारांच्या स्थानिक मागणीची पूर्तता करून ‘आत्मनिभार भारत’ बनवण्याच्या दिशेने बदलत असलेल्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगानुसार राहणे आणि भारतीय कामगारांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, हे यामागील उद्दीष्ट आहे.

देशभरातील व्यावसायिक प्रशिक्षणांच्या विकासासाठी आणि समन्वय साधण्यासाठी एमएसडीईची डीजीटी, ही सर्वोच्च संस्था, नव्या प्रस्तावांच्या निर्मितीसाठी आणि अशा नवीन-युग अभ्यासक्रमांसाठी शिक्षक / प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्यांना सर्व शक्य तांत्रिक सहाय्य प्रदान करेल. 

यासंदर्भात, डीजीटीने यापूर्वीच 13 राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा (एनएसक्यूएफ) अभ्यासक्रमांना परवानगी दिली आहे. डेटा विश्लेषक आणि शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ मेकाट्रॉनिक्स, स्मार्ट एग्रीकल्चर, क्लाउड कम्प्यूटिंग, डिझाइनर्स, ब्लॉकचेन विशेषज्ञ, सॉफ्टवेअर आणि अॅप्लिकेशन डेव्हलपर, जिओनफॉरमॅटिक्स सहाय्यक, एआय आणि मशीन लर्निंग स्पेशॅलिस्ट, बिग डेटा स्पेशालिस्ट, रोबोटिक्स इंजिनियर्स आणि ई-कॉमर्स आणि समाजमाध्यम विशेषज्ञ यांचा यामध्ये समावेश आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी 6 महिन्यांपासून 2 वर्ष इतका आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे म्हणाले, तंत्रज्ञान क्रांतीची नवीन लाट नोकरीचे स्वरूप बदलण्यासाठी तयार झाली आहे आणि या बदलत्या काळाच्या अनुषंगाने पुढे जाण्यासाठी आपण कौशल्य हाती घेण्याची गरज आहे. भविष्यातील उद्योगांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत.

आधुनिक तंत्रज्ञानासंदर्भात उद्योग आणि प्रशिक्षणाच्या आवश्यकतेशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नांमध्ये डीजीटीने 21 व्या शतकाच्या डिजिटल कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांना  उद्योग 4.0 क्रांतीनुसार चालना देण्यासाठी तंत्रज्ञान कंपन्यांसह विविध सामंजस्य करार केले आहेत. यात आयबीएम इंडिया प्रायव्हेट लि., एसएपी इंडिया, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन (इंडिया) लि., नॅसकॉम, क्वेस्ट अलायन्स, एक्सेंचर आणि सिस्को या प्रमुख कंपन्या आहेत.

 

* * *

S.Thakur/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1670744) Visitor Counter : 107